शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
3
स्वतःवर गोळी झाडणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याची IAS पत्नी आली समोर; एफआयआर दाखल, कुणावर केले आरोप?
4
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
5
"भाई, ती मुलगी नाही...एक पंजा अन्...!"; थेट वाघोसोबतच 'लिप लॉक' करताना दिसला तरुण, Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल
6
घरबसल्या महिन्याला ₹९२५० ची कमाई करुन देणारी पोस्टाची स्कीम! पण एक चूक पडेल भारी, बसू शकतो ३० हजारांचा फटका
7
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
8
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
9
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
10
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
11
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
12
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
13
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
14
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
15
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
16
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
17
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
18
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
19
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
20
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन

वर्ग पाच अन् शिक्षक मात्र दोन

By admin | Updated: July 18, 2014 23:24 IST

किमान तीन शिक्षक मिळावेत : पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी

कुंभोज : आर.टी.ई.नुसार राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पाचवीचे २०,५६७ वर्ग जोडण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. तथापि, बहुतांश डोंगरवस्तीतील ६० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळेत पाचवीपर्यंत दोन शिक्षक मंजूर आहेत. अशा शाळेत वर्ग पाच आणि शिक्षक दोन, अशा परिस्थितीत शिक्षकांनी शिकवायचे कसे? असा प्रश्न उपस्थित करीत पाचवीपर्यंत किमान तीन शिक्षक मिळावेत, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी संघटनेच्यावतीने शासनाकडे केली आहे. आर.टी.ई. कायद्यानुसार पहिली ते पाचवीसाठी ६० विद्यार्थी पटास दोनच शिक्षक मंजूर असल्याने एका शिक्षकाला तीन वर्गांचे अध्यापन करावे लागणार आहे. शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होऊ नये, म्हणून पहिली ते पाचवीसाठी किमान तीन, तर १६१ विद्यार्थीपटास सहावा शिक्षक मंजूर होणे आवश्यक आहे. शासनाने १५१ पटास मुख्याध्यापक पद मान्य केले असले, तरी शाळेच्या प्रशासकीय कामकाजासाठी पटाची अट न ठेवता पहिली ते सातवी अथवा आठवीपर्यंतच्या शाळांना विनाअट मुख्याध्यापक द्यावा, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर) शासन निर्णयाचे स्वागत चालू शैक्षणिक वर्षापासून प्राथमिक शाळेत राज्यभर नव्याने सुरू करण्यात आलेल्या पाचवी ते आठवीच्या वर्गांना आताच शिक्षक देण्यात येणार असल्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे अतिरिक्त शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. नवीन वर्गांसाठी अतिरिक्त शिक्षकांची नेमणूक करावी, या मागणीचा पाठपुरावा शासनाकडे केला होता. शासन निर्णयाचे संघटनेच्यावतीने स्वागत करीत असल्याचे पाटील यांनी नमूद केले आहे.