शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आठवले गटाकडून जिल्ह्यातील चार जागांवर दावा

By admin | Updated: July 23, 2014 00:30 IST

‘दे धक्का’ मेळाव्यात मागणी : पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेच्या १५ जागा लढविणार

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीला रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बळ दिल्यामुळेच महाराष्ट्रात तब्बल ४२ जागांवर महायुतीचा विजय झाला. या यशात रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या मोठा वाटा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात १५ जागा लढविणार असून, जिल्ह्यातील कोल्हापूर दक्षिण, कागल, वडगाव आणि राधानगरी-भुदरगड मतदारसंघाची मागणी पक्षाच्या ‘दे धक्का’ मेळाव्यात कार्यकर्त्यांनी केली. महायुतीने या जागेसाठी विचार केला नाही तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.आज, मंगळवारी पक्षाच्यावतीने दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी मेळावा झाला. प्रमुख पाहुणे म्हणून पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस नवनाथ कांबळे, तसेच प्रा. शहाजी कांबळे, मंगलराव माळगे, दुर्वास कदम, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे उपस्थित होते.यावेळी स्वागताध्यक्ष दुर्वास कदम, प्रा. शहाजी कांबळे, मंगलराव माळगे यांनी, येत्या विधानसभा निवडणुकीत भीमशक्ती-शिवशक्ती एकत्र येणार असल्याने शंभर टक्के यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. पश्चिम महाराष्ट्र सहसचिव डॉ. अनिल माने यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्यास विश्वास सरुडकर, दिलीप कांबळे, नामदेव कांबळे, बाळासाहेब वाशीकर या तालुकाध्यक्षांनी जिल्ह्यातील चारही जागा निवडून आणू, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी अविनाश शिंदे, काशीनाथ कांबळे, हणमंत साठे, जगन्नाथ ठोकळे, बबन हुपरीकर, नागनाथ होवाळ आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)