शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

शहर होणार आज ‘शिवमय’

By admin | Updated: February 19, 2016 00:28 IST

शिवजयंतीची जय्यत तयारी; शिवजन्मकाळ, मिरवणुका, व्याख्यानासह विविध उपक्रम

कोल्हापूर : शिवजन्मकाळ, भव्य मिरवणुका, व्याख्याने, विनामूल्य आरोग्य शिबिर अशा विविध उपक्रमांनी आज, शुक्रवारी शहरात शिवजयंती साजरी होणार आहे. विविध तरुण मंडळे, संस्थांनी शिवजयंतीची जय्यत तयारी केली आहे. त्याला प्रबोधनासह सामाजिक उपक्रमांची जोड देण्यात आली आहे. जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील शिवाजी चौक, निवृत्ती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आकर्षक विद्युत रोषणाई गुरुवारी करण्यात आली होती.शहरात शुक्रवारी सकाळी दहा वाजता छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टतर्फे नर्सरी मैदान येथील मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा होईल. शिवाजी पेठेतील श्री शिवाजी तरुण मंडळातर्फे सकाळी आठ वाजता उभा मारुती चौकात शिवजन्मकाळ सोहळा होणार आहे. त्यानंतर अर्धा शिवाजी पुतळा येथे सकाळी नऊ वाजता शिवज्योतीचे स्वागत होणार आहे. दुपारी चार वाजता ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने उभा मारुती चौकातून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडतर्फे सायंकाळी साडेपाच वाजता हुतात्मा पार्क येथून मिरवणूक काढण्यात येणार आहे. आनंदी महिला जागृती संस्थेतर्फे आर. के. नगर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. छत्रपती शाहूराजे फौंडेशनतर्फे मिरजकर तिकटी येथे दहा वाजता जिलेबी वाटप केले जाणार आहे. कोल्हापूर शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी चौक येथे शिवजयंती साजरी होणार आहे. दरम्यान, शहरातील विविध परिसरात गुरुवारी तरुण, लहान मुले जयंतीच्या तयारीत गुंतली होती. सायंकाळनंतर शिवज्योत आणण्यासाठी विविध मंडळांचे कार्यकर्ते पन्हाळ्याला रवाना झाले. काहीजण मंडप सजावट, मिरवणुकीची तयारी करत होते. (प्रतिनिधी)असे होणार उपक्रम, कार्यक्रमकलानिधी गडाची सफाई : कागल येथील वनमित्र संस्था दोनशे स्वयंसेवकांच्या माध्यमातून चंदगड येथील कलानिधी गडाची साफसफाई गुरुवारी सुरू केली आहे. आज, शुक्रवारी ही मोहीम सुरू राहणार आहे.शेकापतर्फे व्याख्यान : ‘शेकापक्षाच्या कार्यालयात सकाळी दहा वाजता प्रा. डॉ. संदीप कीर्दत यांचे व्याख्यान होणार आहे.ढोल-ताशा वादन : शनिवार पेठेतील शाहू गर्जना ढोल-ताशा पथकाचे सकाळी साडेनऊ वाजता नर्सरी मैदान येथे सादरीकरणशिवकल्याण कन्या निधीचे वितरण : शिवराष्ट्र संस्था व रोटरी क्लब आॅफ कोल्हापूरतर्फे माजलगाव (बीड) मधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींसाठी २२ फेब्रुवारीला एकूण दोन लाख रुपयांच्या शिवकल्याण कन्या निधीचे वितरण होणार आहे.