शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

शहर तापले; मार्केट गारठले

By admin | Updated: April 17, 2017 00:59 IST

कोल्हापूर @ ३९ डिग्री : कडक उन्हामुळे नागरिक हैराण

कोल्हापूर : उन्हाचा तडाखा वाढल्याने कोल्हापूरकर हैराण झाले आहेत. त्याचा परिणाम जनजीवनावर होत आहे. उष्णतेचा पारा गेल्या आठवड्यापासून ३९ सेल्सिअस अंशांवर पोहोचल्याने असह्य होणाऱ्या उन्हापासून वाचण्यासाठी बहुतांश लोक दुपारचा वेळ घरातच घालवीत आहेत. रविवारी उष्णतेचा पारा ३९ सेल्सिअस अंशांवर पोहोचल्याने दुपारनंतर शहरातील अधिकतर रस्ते हे ओस पडल्याचे, तर बाजारपेठांमध्ये शांतता पसरल्याचे दिसून आले. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच यंदा उन्हाच्या झळा बसू लागल्या. मार्चमध्ये दिवसा उकाडा आणि रात्री थंडी असे वातावरण होते. एप्रिलच्या सुरुवातीपासून उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कडक ऊन आणि झोंबणाऱ्या झळा त्यांना सहन कराव्या लागत आहेत. अनेकांनी त्यापासून संरक्षणासाठी दुपारी बाहेर न पडता एक ते चार यावेळी घरात थांबण्याचा अथवा ज्यांचे फिरतीचे काम आहे, त्यांनी कार्यालय, बगीचा या ठिकाणी विश्रांती घेण्याचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, भाऊसिंगजी रोड, बिंदू चौक, सायबर चौक, आदी परिसरांतील नेहमी गजबजलेले रस्ते निर्मनुष्य होत आहेत.दुपारी बारापर्यंत आणि चारनंतर बाजारपेठेत लोकांची वर्दळ दिसून येत आहे. तापमानाचा पारा ३९ सेल्सिअस अंशांवर पोहोचल्याने रविवारी अनेक रस्ते दुपारच्या वेळी ओस पडले होते. लक्ष्मीपुरी, शाहूपुरी या बाजारपेठांमध्ये शांतता होती.दुपारी शांतताउन्हाचा परिणाम बाजारपेठेवर होत आहे. दुपारी एक ते चार या वेळेत ग्राहकांचे प्रमाण अल्प असल्याचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर यांनी सांगितले. ते म्हणाले, सकाळी दहा ते दुपारी एक आणि दुपारी साडेचार ते रात्री नऊ या वेळेत ग्राहकांची बाजारपेठेत गर्दी होत आहे. तापमान कमीची आशागेल्या आठवड्यात कोल्हापुरातील तापमान ३२ ते ३९ सेल्सिअस अंशांपर्यंत पोहोचले आहे. हिमालयातून येणाऱ्या वाऱ्याची दिशा बदलली, तरच तापमान काहीसे कमी होण्याची आशा आहे, असे विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांनी सांगितले.