शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने कोल्हापूर शहर गारठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 00:13 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढले, दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने संपूर्ण शहर दिवसभर थंडीने गारठले होते. शहरातील सखल भागांत पाणी साचले, तर नाल्यांना नदीचे स्वरूप आले. अनेक ठिकाणी घरांत, तळघरांत पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. राजारामपुरी जनता बझार चौक, राजहंस प्रेस, बागल चौक परिसर, ...

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढले, दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने संपूर्ण शहर दिवसभर थंडीने गारठले होते. शहरातील सखल भागांत पाणी साचले, तर नाल्यांना नदीचे स्वरूप आले. अनेक ठिकाणी घरांत, तळघरांत पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. राजारामपुरी जनता बझार चौक, राजहंस प्रेस, बागल चौक परिसर, महावीर गार्डन परिसर, शास्त्रीनगर, व्हीनस कॉर्नर, जिल्हाधिकारी कार्यालय चौक, बाबूभाई परिख पूल, आदी परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले होते. अनेक मार्गांवर वाहनधारकांना कसरत करावी लागली; त्यामुळे संपूर्ण शहरात वाहतुकीची कोंडी झाली होती.राजाराम बंधाऱ्यानजीक पंचगंगा नदीची पाणी पातळी धोका पातळीच्या दिशेने वाढत आहे. सायंकाळी सात वाजता पाणी पातळी ४१ फुटांपर्यंत वाढली होती. शहरातील अनेक भागांत झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत.गेले चार दिवस मुसळधार पावसाने कोल्हापूर शहराला झोडपून काढले. जिल्ह्यात व शहरात पावसाचा सोमवारी दिवसभर जोर कायम राहिल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे; त्यामुळे नदीकाठच्या तसेच नाल्याकाठच्या रहिवाशांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.राजहंस प्रेस परिसरात तळ्याचे स्वरूपजयंती नाल्याची पाणी पातळी वाढल्याने पाणी पात्र सोडून बाहेर पडले; त्यामुळे नागाळा पार्क परिसरातील राजहंस प्रिंटिंग प्रेस ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाºया मार्गावर पाणी मोठ्या प्रमाणात जमा झाले. हे पाणी राजहंस प्रेसमध्ये घुसले होते. अग्निशमन दलाने पाणी बाहेर काढले. त्या परिसरात काही तळघरांत पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही पाणी साचल्याने तेथील काही तळघरांत पाणी शिरले होते. महावीर गार्डन परिसरातील हत्ती हाऊसमध्येही शिरलेले पाणी अग्निशमन दलाने बाहेर काढले.लाईन बझारमध्ये धावत्या मोटारीवर झाड पडलेशहरात सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास लाईन बझार परिसरात पद्मा पथक चौकानजीक रस्त्याकडेचे झाड भरधाव वेगाने धावणाºया मोटारीवर पडल्याने मोटारीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुदैवाने या मोटारीतील दोेघांना कोणतीही इजा झाली नाही; पण याच झाडाची फांदी शेजारील घरावर पडल्याने घराची भिंंत पडली. याशिवाय बिंदू चौक, शिवाजी उद्यमनगरातील युनिक अ‍ॅटो सर्व्हिस सेंटरनजीक, शिवाजी पार्क परिसरातील गद्रे गार्डन शेजारी रस्त्यावर, राजारामपुरीतील साई कार्डियाक चौकात, नागाळा पार्कमधील सरोज अपार्टमेंटसमोर रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक खोळंबली. अग्निशमन दलाच्या पथकाने झाडे बाजूला करून वाहतूक खुली केली.