शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शहर विकास आघाडी -कारंडे गट एकत्रित लढणार

By admin | Updated: May 28, 2016 00:47 IST

आगामी इचलकरंजी निवडणूक : अजित जाधव यांची माहिती

इचलकरंजी : येथील नगरपालिका शिक्षण मंडळाच्या निवडीनंतर आगामी नगरपालिका निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. या निवडीप्रमाणेच नगरपालिका निवडणुकीतही शहर विकास आघाडी व राष्ट्रवादीतील कारंडे गट एकत्रितपणे निवडणूक लढविणार असून, जनतेसमोर जाताना भ्रष्टाचारमुक्त नगरपालिका, असा आमचा अजेंडा असणार आहे, असे आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव यांनी सांगितले. नगरपालिका शिक्षण मंडळ सभापती निवडीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नगरपालिका शिक्षण मंडळावरील ५० वर्षांची काँग्रेसची सत्ता मोडून काढत सहा महिन्यांपूर्वी शहर विकास आघाडीने सत्ता काबीज केली. अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज करून शिक्षण मंडळाच्या माध्यमातून शाळांमध्ये आवश्यक बदल सुरू केले. मावळते सभापती राजू हणबर यांनी कारकीर्द यशस्वीपणे पार पाडली. त्यानंतर शहर विकास आघाडीचे इम्रान बागवान यांना संधी दिली आहे. तर उपसभापतिपदी कारंडे गटाचे नितीन कोकणे हेच राहणार आहेत. याप्रमाणेच आगामी नगरपालिकेची निवडणूकही आमदार सुरेश हाळवणकर यांच्या नेतृत्वाखालील शहर विकास आघाडी व राष्ट्रवादीतील कारंडे गट एकत्रित लढविणार असून, त्याला नक्कीच यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी शिक्षण मंडळाचे नूतन सभापती इम्रान बागवान, नितीन कोकणे, तानाजी पोवार, महादेव गौड, विलास रानडे उपस्थित होते. (वार्ताहर)