शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राजारामपुरीतील मंडळांना वेध देखाव्यांचे

By admin | Updated: August 31, 2014 00:30 IST

मिरवणुकीद्वारे ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना : कार्यकर्त्यांची धावपळ सुरू

कोल्हापूर : शहरात सर्वत्र अनंत चतुर्दशीदिवशी गणेशमूर्तीची भव्य मिरवणूक काढली जाते. मात्र, राजारामपुरीत ‘श्रीं’चे स्वागत भव्य मिरवणुकीद्वारे केले जाते. यावर्षीही राजारामपुरीतील अनेक मंडळांनी भव्य मिरवणुकीद्वारे ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना केली. आता मंडळांतील कार्यकर्त्यांना वेध लागले ते देखावा सुरू करण्याचे. राजारामपुरीत मोजकीच मंडळे जरी देखावे करत असली तरी काही मंडळे देखावे न करता आकर्षक व मोठ्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करतात. येथील गणेश दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. त्यामुळेच नोकरी-व्यवसायाचा व्याप सांभाळून मंडळाच्या कार्यकर्त्यांची देखावे सुरू करण्यासाठी धावपळ सुरू आहे. काही मंडळांत मुख्यत: देखावे करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत कार्यकर्ते स्वत: कारागिरांना मदत करत आहेत, असे चित्र राजारामपुरीत दिसत आहे. राजारामपुरी येथील बहुसंख्य मंडळांच्या देखाव्याचे काम रात्रीच्या वेळीच सुरू असते. दिवसा वाहतुकीमुळे अडसर होत असल्याने हे काम रात्री करण्याला कार्यकर्ते पसंती देत आहेत. येथील काही मंडळे पहिल्या दिवशीच देखावे खुले करतात, तर बहुतांश मंडळे घरगुती गणेशमूर्ती विसर्जनानंतर देखावे खुले करतात. गेल्या चार ते पाच वर्षांपासून पारंपरिकता जपत आधुनिकतेकडे झेपावणारे देखावे करत असल्याने नागरिकांची देखावे पाहण्यासाठी गर्दी होत आहे.