शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सर्किट बेंचचे पत्र दोन वर्षे उच्च न्यायालयातच पडून, शिफारशीची गरज : आता राजकीय इच्छाशक्तीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:26 IST

कोल्हापूर : कोल्हापूरला सर्किट बेंच व्हावे यासाठी राज्य शासनाने केलेल्या शिफारशींचा पुनर्विचार करण्याची विनंती करणारे राज्य शासनाचे पत्र गेली ...

कोल्हापूर : कोल्हापूरला सर्किट बेंच व्हावे यासाठी राज्य शासनाने केलेल्या शिफारशींचा पुनर्विचार करण्याची विनंती करणारे राज्य शासनाचे पत्र गेली दोन वर्षे उच्च न्यायालयातच पडून असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. विधि व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी राज्य शासनाच्या वतीने खासदार संभाजीराजे यांना पाठविलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे. त्यामुळे सर्किट बेंचचा प्रश्न लोंबकळत राहिला आहे. न्यायालयीन भाषेत हा पश्न तारीख पे तारीख अशा घोळात अडकला आहे. आता नव्या सरकारच्या मागे लागून तातडीने मुख्य न्यायाधीशांकडून कशी शिफारस होईल यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.

राज्यात उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी खंडपीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यापूर्वी राज्य पुनर्रचना अधिनियम १९५६ च्या कलम ५१ (२) नुसार उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची सहमती आवश्यक असते. सर्वोच्च न्यायालय खंडपीठ मंजुरीस विलंब लावते, त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी खंडपीठ स्थापन करण्यास बराच अवधी लागू शकतो, ही बाब लक्षात आल्यानंतर राज्यात भाजप-शिवसेेनेचे सरकार सत्तेत असताना राज्य मंत्रिमंडळाने कोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूरची लोकसंख्या, मुंबईपासूनचे अंतर, प्रलंबित खटल्यांची संख्या विचारात घेऊन सर्किट बेंच स्थापन करण्यास सहमती देण्याची शिफारस शासनाच्या वतीने १७ जुलै २०१५ ला मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना करण्यात आली; परंतु त्याचवेळी पुण्यातूनही खंडपीठ स्थापन करण्याची मागणी झाली. मागच्या सरकारमध्ये पुण्यातील सर्व आमदार भाजपचे होते. तत्कालीन मंत्री गिरीश बापट यांनी मंत्रिमंडळात हा विषय फारच ताणून धरला. त्यामुळे राज्य सरकारने या शिफारसपत्राच्या खाली कोल्हापूरसोबत पुण्याचाही खंडपीठासाठी विचार व्हावा, अशी एक ओळ जोडली. दोन प्रमुख शहरांतून मागणी आल्याने मुख्य न्यायाधीशांनाही निर्णय घेण्यास अडचण झाली. त्यामुळे कुणाचीच शिफारसच होऊ शकली नाही. त्यानंतर कोल्हापूरकरांनी पुन्हा आंदोलन केल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्याने फक्त कोल्हापूरचा उल्लेख करून राज्य सरकार शिफारस करण्यासंबंधीचे पत्र मुख्य न्यायाधीशांना पाठवेल, असे आश्वासन दिले. त्यानुसार राज्य शासनाने २८ फेब्रुवारी २०१८ ला तसे पत्र पाठविले; परंतु त्यानंतरही मुख्य न्यायाधीशांकडून ही शिफारस झाली नाही, म्हणून राज्य सरकारने तातडीने बैठक बोलाविण्याची विनंती १९ जानेवारी २०१९ ला पत्र पाठवून मुख्य न्यायाधीशांकडे केली. पुन्हा १९ मार्च २०२० ला पत्र पाठवून स्मरणही करण्यात आले; परंतु बैठकही नाही व शिफारसही नाही, अशा स्थितीत हा प्रश्न लोंबकळत आहे.

नव्याने रणशिंग..

कोल्हापूर बार असोसिएशनने गेल्याच आठवड्यात बैठक घेतली. त्यामध्ये मुख्यमंत्री व मुख्य न्यायाधीश यांची भेट घेण्याचा निर्णय झाला आहे. कोरोनामुळे वर्षभर या प्रश्नावर काहीच हालचाल झालेली नाही.