शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

सर्किट बेंचप्रश्नी असहकार आंदोलनाला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 00:04 IST

कोल्हापूर : कोल्हापूर सर्किट बेंचप्रश्नी वकिलांनी रविवारी पुकारलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालय कामकाजापासून अलिप्त राहण्याच्या आंदोलनाला कोल्हापुरात यश आले. लोकन्यायालयाला आलेल्या ...

कोल्हापूर : कोल्हापूर सर्किट बेंचप्रश्नी वकिलांनी रविवारी पुकारलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालय कामकाजापासून अलिप्त राहण्याच्या आंदोलनाला कोल्हापुरात यश आले. लोकन्यायालयाला आलेल्या पक्षकारांना गुलाबफूल देऊन गांधीगिरी पद्धतीने त्यांचे मन वळविण्यात आले. त्याला पक्षकारांनी साथ देत जिल्हा व सत्र न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून ते परत माघारी परतले. त्यामुळे हे आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा वकिलांनी केला. यावेळी वकील व पोलीस यांच्यात किरकोळ कारणावरून शाब्दिक चकमक झाली. दरम्यान, उद्या मंगळवारी सहा जिल्ह्यांतील खंडपीठ कृती समितीची बैठक कोल्हापुरात होणार आहे.सकाळी कसबा बावड्यातील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वकील एकत्र जमले. साडेनऊ वाजल्यापासून पक्षकार व बँक अधिकारी, विम्यांचे प्रतिनिधी राष्ट्रीय लोकन्यायालयासाठी येण्यास सुरुवात झाली. या ठिकाणी बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, उपाध्यक्ष अ‍ॅड. आनंदराव जाधव, सेक्रेटरी अ‍ॅड. सुशांत गुडाळकर, अ‍ॅड. माजी अध्यक्ष विवेक घाटगे, अ‍ॅड. प्रकाश मोरे, आदींनी पक्षकारांना हात जोडून व गुलाबफूल देऊन सर्किट बेंचसाठी तुमचा पाठिंबा महत्त्वाचा आहे, असे सांगत आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्या, अशी विनंती केली. या विनंतीला मान देऊन अनेकजण प्रवेशद्वाराजवळून माघारी परतले. यावेळी शाहूपुरी पोलीस ठाण्याचा बंदोबस्त होता.त्यानंतर सकाळी साडेअकराच्या सुमारास सर्व वकील प्रवेशद्वाराजवळ खुर्च्या टाकून बसले. यावेळी ‘वुई वॉँट हायकोर्ट इन कोल्हापूर सर्किट बेंच’ अशा घोषणा दिल्या. राष्ट्रीय लोकन्यायालयासाठी आलेल्या शहाजी लॉ, न्यू लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वकिलांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत ते माघारी परतले. दरम्यान, राष्ट्रीय लोकन्यायालयासाठी पक्षकारांना येऊ द्या, अशी विनंती न्यायालयीन पातळीवरही वकिलांना करण्यात आली. आंदोलनात माजी अध्यक्ष अ‍ॅड. अजित मोहिते, अ‍ॅड. रणजित गावडे, अ‍ॅड. विजय महाजन, अ‍ॅड. सचिन पाटील, अ‍ॅड. अभिजित कापसे, अ‍ॅड. आर. एल. चव्हाण, अ‍ॅड. सतीश खोतलांडे, अ‍ॅड. बाळासाहेब पाटील-अरळगुंडीकर, अ‍ॅड. प्रशांत पाटील, अ‍ॅड. नारायण भांदिगरे, अ‍ॅड. डी. डी. देसाई, अ‍ॅड. प्रमोदिनी शिंदे, अ‍ॅड. चारूलता चव्हाण, अ‍ॅड. मीना पोवार, अ‍ॅड. दीपक पिंपळे, अ‍ॅड. नामदेव हतकर, अ‍ॅड. कुलदीप कोरगावकर, आदी उपस्थित होते.वकील-पोलीस शाब्दिक चकमकरविवारी सकाळी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एकजण जात होता.त्याला पोलिसांनीच आत सोडले, असासमज झाल्यानेवकील व पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या प्रकारामुळे येथील वातावरण तापले.