शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शित्तूर-वारुणमध्ये चुरशीची लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:19 IST

सतीश नांगरे शित्तूर-वारुण : शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील शित्तूर-वारुण ग्रामपंचायतीची निवडणूक चुरशीने होणार असल्याचे चित्र आहे. ही निवडणूक ...

सतीश नांगरे

शित्तूर-वारुण : शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील शित्तूर-वारुण ग्रामपंचायतीची निवडणूक चुरशीने होणार असल्याचे चित्र आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केला गेला. मात्र समझोता होऊ शकला नाही. जनसुराज्य व शिवसेना यांच्यामध्ये मुख्य लढत असून पाच अपक्ष उमेदवारांच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीत अधिक रंगत येणार आहे.

आमदार डॉ. विनय कोरे व माजी आमदार सत्यजित पाटील यांचे गट एकमेकांसमोर उभे आहेत. या निवडणुकीत जनसुराज्य, काँग्रेस व शेतकरी कामगार पक्षाची आघाडी आहे; तर शिवसेनेबरोबर राष्ट्रवादीची युती आहे. गतवेळी शिवसेनेविरोधात याच आघाडीने विजय मिळविला होता. त्या आधीच्या पंचवार्षिकमध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता होती. ‘तव्यावरची भाकरी करपण्याआधी ती पालटावी’ या न्यायाने दर पंचवार्षिक निवडणुकीत या गावामध्ये सत्ताबदल होत असतो.

सत्ताधाऱ्यांनी गेल्या पाच वर्षांत गावामध्ये आमदार विनय कोरे, माजी खासदार राजू शेट्टी, जिल्हा परिषदेचे सदस्य सर्जेराव पाटील, करणसिंह गायकवाड, भाई भारत पाटील या नेत्यांच्या सहकार्यामुळे अनेक विकासकामे राबविली आहेत. या विकासकामांच्या जोरावरच या आघाडीचे कालिका ग्रामविकास परिवर्तन पॅनेल मैदानात उतरले आहे. या दोन्ही पॅनेलच्या विरोधात यावेळी पहिल्यांदाच गावामध्ये पाच अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

अनुसूचित जाती वर्गाचा समावेश असलेल्या प्रभाग १ मध्ये एकूण पाच उमेदवार रिंगणात उतरले आहेत. पैकी तीन उमेदवार अपक्ष आहेत.

सदस्य- ११, प्रभाग- ४, एकूण मतदार- ३२७९