शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कुंभोजमध्ये मद्यपींना चोप

By admin | Updated: July 10, 2017 00:32 IST

कुंभोजमध्ये मद्यपींना चोप

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभोज : कुंभोजमध्ये गावठी दारू विक्रीविरोधात सुरू झालेल्या लढ्यातील रणरागिणींच्या आक्रमक पवित्र्यामुळे कुंभोज, हिंगणगावातील दारू अड्डेचालकांनी धास्ती घेतली आहे. उघडपणे दारूविक्री बंद असली तरी काही ठिकाणी चोरून विक्री सुरूच असल्याने रविवारी सायंकाळी आंदोलक महिलांनी गावातून फेरी काढून संपूर्ण दारूबंदीचा एल्गार केला. तर सकाळी सहा मद्यपींना आंदोलक महिलांनी चोप दिला. त्यामुळे मद्यपींनीही दारूबंदी लढ्याचा धसका घेतला आहे.कुंभोजमध्ये दोन दिवसांपासून दारूबंदीसाठी सुरू असलेल्या लढ्यादरम्यान पहिल्या दिवशी माजी सरपंच कमल सुवासे, रुपाली घाटगे यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजातील बहुसंख्य महिलांनी चार दारूअड्डे उद्ध्वस्त केले.त्यांनतर पोलिसांनी दोन दारू अड्डेचालकांवर कारवाई केली. दरम्यान, रविवारी सकाळी कुंभोजमध्ये सहा मद्यपींना आंदोलक महिलांनी चोप दिला. पोलिसांची कारवाई, महिलांच्या धास्तीने उघडपणे दारू विक्री बंद झाली असली तरी चोरून दारू विक्री सुरू असल्याची खात्री झाल्याने संतापलेल्या दीडशेहून अधिक महिलांनी रविवारी सायंकाळी गावातून फेरी काढून दारूबंदी झालीच पाहिजे, उभी बाटली आडवी झालीच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. फेरीत माजी सरपंच कमल सुवासे, रूपाली पुजारी, आक्काताई सुवासे, रूपाली घाटगे, उज्ज्वला घाटगे, कमल घाटगे, बयाबाई घाटगे, माया गुजरे, रूबिका भोरे, आक्काताई घाटगे, मीना घाटगे, राजू घाटगे, विजय सुवासे, जानका घाटगे आदी सहभागी झाल्या होत्या....अन् हिंगणगावातील दारुविक्रेते पळालेकुंभोज येथील गावठी दारू अड्डे महिलांनी फोडल्यामुळे कुंभोजमधील मद्यपी हिंगणगावमध्ये जात होते. त्यामुळे संतापलेल्या कुंभोजच्या रणरागिणींनी शनिवारी रात्री नऊ वाजता हिंगणगाव (ता. हातकणंगले) येथील दारूअड्ड्यावर चाल केली. मात्र, विके्रत्यांना याची कुणकुण लागताच त्यांनी दारुअड्ड्यांना कुलूप ठोकून तेथून पळ काढला. हातात दांडकी घेऊन अड्डे उद्ध्वस्त करण्याच्या इराद्याने गेलेल्या महिलांनी अड्ड्यांसमोर तासभर बैठक मारली. काही ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी दोन्हीही गावठी दारू अड्डेचालकांना समज देऊ, असे आश्वासन दिल्याने आंदोलक महिलांनी अकरा वाजता हिंगणगाव सोडले. जाताना त्यांनी पुन्हा दारूअड्डे सुरू झाले की त्यांची गय केली जाणार नाही, आम्ही ते अड्डे उद्ध्वस्त करू, असा इशाराही त्यांनी दिला. यात आक्काताई घाटगे, मंगल आवळे, उज्वला घाटगे, सुरेखा सुवासे, अनिता घाटगे, शालन लोंढे, शोभा घाटगे, सुमन भोरे, लता पांढरे, रुक्काबाई घाटगे, जानका घाटगे, हिराबाई घाटगे, सुमन सुवासे, शालन सुवासे, छाया लोंढे, मंगल घाटगे, कमल घाटगे, छाया सकटे, रूपाली घाटगे, ताराबाई कांबळे, आदी सहभागी झाल्या होत्या.दारूबंदी लढ्यात ग्रामपंचायत मागे का?आंदोलक महिलांनी दारुअड्डे उद्ध्वस्त करून शुक्रवारी पाठिंब्यासाठी ग्रामपंचायतीत ठिय्या मारला होता. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दारूबंदी लढ्यात आम्ही यापुढे सहकुटुंब तुमच्या सोबत असू ,असे सांगितले होते. असे असताना केवळ माजी सरपंच, सदस्या रूपाली पुजारी वगळता कोणी पदाधिकारी फेरीत सहभागी झाले नाही. ग्रामपंचायत सदस्य कलगोंडा पाटील, जहाँगीर हजरत, माजी पंचायत समिती सदस्य संतोष माळे हे फेरीदरम्यान उपस्थित होते. मात्र, ते फेरीत सहभागी झाले नाहीत. यावरून संतप्त बनलेल्या आंदोलक कमल सुवासे यांनी ग्रामपंचायत दारूबंदी लढ्यात मागे का? असा सवाल केला.