शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चोपडीत अपघातात दहावीचा विद्यार्थी ठार

By admin | Updated: February 28, 2016 00:38 IST

दोघे गंभीर : निरोप समारंभानंतर दुर्घटना

मणदुरे : शाळेतील निरोप समारंभ आटोपून घराकडे निघालेल्या दहावीतील तीन विद्यार्थ्यांच्या दुचाकीला जीपने धडक दिली. या अपघातात एकजण ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले. पाटण तालुक्यातील चोपडी हद्दीत शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. रमेश गणेश मोळावडे (वय १६, रा. चोपडी) असे अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे, तर गंभीर जखमी असलेल्या संजय विश्वनाथ जाधव व सुयश दादासाहेब जाधव (दोघेही रा. चोपडी) या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्यामुळे गावोगावच्या शाळांमध्ये सध्या दहावीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ होत आहे. बेलवडेतही न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ शुक्रवारी होता. यात दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये बेलवडेसह चोपडीतील विद्यार्थीही शिक्षणासाठी येतात. समारंभासाठी चोपडीतील रमेश, संजय व सुयश हे तिघे शाळकरी मित्र दुचाकी (एमएच १० ए ६४८७)वरून शाळेत आले होते. समारंभ आटोपल्यानंतर पुन्हा हे तिघे दुचाकीवरून गावी चोपडीला निघाले. चोपडीच्या हद्दीत ‘लंगडाचा वाडा’ नावच्या परिसरात आले असता समोरून आलेल्या वडाप जीपची (एमएच १० सी २७२२) दुचाकीला जोराची धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिघेही दूरवर फेकले गेले. त्यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रमेशचा मृत्यू झाला, तर परिसरातील ग्रामस्थांनी जखमी सुयश व संजय यांना उपचारार्थ रुग्णालयात हलविले. अपघाताची नोंद पाटण पोलिसांत झाली आहे. रमेशने तोडली अर्ध्यावर दोस्ती चोपडी गावातील रमेश मोळावडे, संजय जाधव, सुयश जाधव हे तिघे शाळेसाठी नेहमीच एकत्र जात असत. अभ्यासही ते एकत्र करत. शुक्रवारी निरोप समारंभ आटोपून ते तिघे गावाकडे निघाले होते. यावेळी झालेल्या अपघातात रमेशचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे रमेशने दोस्ती अर्ध्यावर सोडल्याची भावना मित्र व्यक्त करीत होते.