शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

जोतिबा येथे शुक्रवारी चोपडाई षष्ठी यात्रा

By admin | Updated: July 29, 2014 23:04 IST

शासकीय नियोजन बैठक : यात्रेची जय्यत तयारी

जोतिबा : तीर्थक्षेत्र जोतिबा डोंगरावर शुक्रवारी (दि. १ आॅगस्ट) श्री चोपडाई देवीची षष्ठी यात्रा भरणार आहे. यात्रेच्या पूर्व नियोजनाची तयारी जोरात सुरू असून, शासकीय अधिकाऱ्यांची यात्रा नियोजन बैठक पन्हाळा येथे घेण्यात आली.या शासकीय बैठकीमध्ये यात्रा काळात वीज, पाणी, वाहतूक, स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देण्याविषयी चर्चा करण्यात आली. यात्रा काळात घाट मार्गातून एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे. कार पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. जोतिबा ग्रामपंचायतीने मुबलक पाणीपुरवठा व स्वच्छता सुविधा पुरविण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. देवस्थान समितीने मंदिरातील विद्युत यंत्रणा, दर्शन रांग व्यवस्था, स्वच्छता करण्यासाठी कर्मचाऱ्यांमार्फत कामाला सुरुवात केली आहे. स्थानिक पुजारी वर्ग घर सजावट, द्रोण-पत्रावळी खरेदीमध्ये व्यस्त आहेत. व्यापारी वर्गाने गुलाल-खोबरे, मिठाईची खरेदी करून साहित्याची मांडणी करण्यास सुरुवात केली आहे. षष्ठी यात्रेला नारळ-लिंबू यांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे याचीही आवक वाढली आहे. (वार्ताहर)श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर १ आॅगस्ट (शुक्रवार) हा षष्ठी यात्रेचा मुख्य दिवस आहे. षष्ठीचा उपवास शुक्रवारचा आहे. नागपंचमी व षष्ठी यात्रा एकाच दिवशी आली आहे. या यात्रेला मुंबई येथील भाविकांची लक्षणीय गर्दी असते. शुक्रवारी रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. शनिवारी सकाळी ६ वाजता धुपारती सोहळ्याने यात्रेची सांगता होणार आहे.