शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

चिकोडी मतदारसंघात हुक्केरी की ज्वोल्ले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:30 IST

निपाणी : चिकोडी लोकसभेसाठी २३ एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर आता कार्यकर्त्यांकडून विजयाची आकडेमोड सुरूझाली आहे. निकाल २३ मे रोजी ...

निपाणी : चिकोडी लोकसभेसाठी २३ एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर आता कार्यकर्त्यांकडून विजयाची आकडेमोड सुरूझाली आहे. निकाल २३ मे रोजी असला तरी संभाव्य निकालाची चर्चा लोकसभा मतदारसंघात जोरात आहे. यावेळी खासदार प्रकाश हुक्केरी हे पुन्हा बाजी मारणार की, सहकार नेते अण्णासाहेब ज्वोल्ले झटका देणार याविषयी चर्चा झडत आहेत.चिकोडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातून खासदार प्रकाश हुक्केरी यांनी, तर भाजपकडून अण्णासाहेब ज्वोल्ले यांनी निवडणूक लढविली. दोन्ही नेते तुल्यबळ असल्याने ही लढत अतिशय अटीतटीची झाली. १५ लाख ७९ हजार ३०९ मतदारांपैकी १२ लाख १० हजार १२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामुळे मतदानाची टक्केवारी ७५.४२ एवढी झाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ७४ टक्क्यांवर मतदान झाले होते. यावेळी एक टक्का मतदान वाढले आहे.निवडणुकीत काँग्रेसकडून प्रकाश हुक्केरी व भाजपकडून तत्कालीन खासदार रमेश कत्ती यांच्यात लढत झाली होती. या लढतीत हुक्केरी यांनी कत्ती यांना पराभूत केले; पण त्यावेळी हुक्केरी यांना फक्त तीन हजारांवर मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे ते मताधिक्य राहणार की घटणार? असा प्रश्न आहे. हुक्केरी हे मातब्बर नेते असले तरी यावेळच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते रमेश जारकीहोळी यांची उघड नाराजी दिसल्याने याचा फटका काँग्रेसला बसू शकतो, तर ज्वोल्ले यांनाही कत्ती बंधूंच्या नाराजीचा फटका बसू शकतो. त्यामुळे निकाल नेमका कसा लागेल? याचा अंदाज अनेक राजकीय लोक लावत आहेत. २०१४ ला १० हजार पेक्षा जास्त मतदारांनी नोटाला मतदान केले होते.आठही विधानसभा मतदारसंघांत बंपर मतदानचिकोडी लोकसभा मतदारसंघात आठ विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी यावेळी निपाणी मतदारसंघात ७७.७१ टक्के, चिकोडी सदलगा मतदारसंघात ८०. ७९ टक्के, हुक्केरी ७२.१७ टक्के, अथणी ७५.२१, रायबाग ७१.७४, कुडची ६९.१६, कागवाड ७५.३१, यमकनमर्डी ८०.३० टक्के मतदान झाले आहे. यापैकी चिकोडी, अथणी, कागवाड व यमकनमर्डी मतदारसंघात काँग्रेसचा प्रभाव असून, बाकी मतदारसंघात भाजपचा प्रभाव आहे. त्यामुळे आता जनतेने कोणाच्या पारड्यात मते टाकली आहेत, हे २३ मे रोजी स्पष्ट होणार आहे.