शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

समिती सदस्यांच्या निवडी बिनविरोध

By admin | Updated: December 21, 2014 00:10 IST

नावे प्रत्येक पक्षाच्या गटनेत्याने महापौरांकडे बंद लखोट्यातून दिली

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या स्थायी, परिवहन तसेच महिला व बालकल्याण समिती सदस्यपदाच्या निवडी आज, शनिवारी अपेक्षेप्रमाणे बिनविरोध आणि निर्विघ्नपणे पार पडल्या. विशेष म्हणजे महिला व बालकल्याण समितीवर कोणी नगरसेविका जायला तयार नसताना त्यांच्या अपरोक्ष नावे जाहीर करावी लागली. महानगरपालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत सभाध्यक्ष महापौर तृप्ती माळवी यांनी निवड झालेल्या सदस्यांची नावे जाहीर केली. तत्पूर्वी ही नावे प्रत्येक पक्षाच्या गटनेत्याने महापौरांकडे बंद लखोट्यातून दिली. स्थायी समितीसाठी आठ, परिवहन समितीसाठी सहा, तर महिला व बालकल्याण समितीसाठी नऊ सदस्य निवडण्यात आले. पाकिस्तानातील पेशावर येथील दहशतवादी हल्ल्याचा सभेत तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला व हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पापांना श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड यांनाही सभागृहाने श्रद्धांजली अर्पण केली. ताराबाई पार्क येथील कारंडे मळ्याला जाणाऱ्या रस्त्याला तसेच तेथील उद्यानाला गायकवाड यांचे नाव देण्याचा सदस्य ठराव मंजूर झाला. स्थायी समिती सदस्य जयश्री राजेंद्र साबळे (काँग्रेस), सर्जेराव श्रीपतराव पाटील, प्रकाश आनंदराव गवंडी, ज्योत्स्ना बाळकृष्ण पवार-मेढे, माधुरी किरण नकाते (सर्व राष्ट्रवादी कॉँग्रेस), मृदुला रमेश पुरेकर (जनसुराज्य), संभाजी रमेश जाधव (शिवसेना), प्रभा सुनील टिपुगडे (भाजप). परिवहन समिती अजित विलासराव पोवार, शशिकांत धोंडिराम पाटील (कॉँग्रेस), रेखा अनिल आवळे, शारदा संभाजी देवणे (राष्ट्रवादी), अरुणा दत्ताजी टिपुगडे (शिवसेना), प्रकाश रामचंद्र नाईकनवरे (जनसुराज्य आघाडी). महिला व बालकल्याण लीला धुमाळ, अपर्णा आडके, दीपाली ढोणुक्षे, संगीता देवेकर (कॉँग्रेस), रोहिणी काटे, रेखा आवळे, कादंबरी कवाळे (राष्ट्रवादी), यशोदा मोहिते (जनसुराज्य आघाडी), पल्लवी देसाई (शिवसेना-भाजप आघाडी). (प्रतिनिधी)