शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

‘चित्री’चे पाणी ४२ टक्क्यांवर

By admin | Updated: March 25, 2016 23:35 IST

झपाट्याने पाणीपातळीत घट : मे महिन्यापासून पाणीप्रश्न गंभीर बनणार

आजरा : आजरा, गडहिंग्लज तालुक्यांतील पाण्याचा प्रमुख स्रोत असणाऱ्या चित्री प्रकल्पातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून, सद्य:स्थितीला पाणीसाठा केवळ ४२ टक्क्यांवर आल्याने मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यांपासून पाणीप्रश्न गंभीर बनणार असल्याचे स्पष्ट होत आहे.मुळातच यावर्षी चित्री प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. सांडव्यावरून पाणी न वाहण्याचे पहिल्यांदाच घडले आहे. सद्य:स्थितीला तापमानात प्रचंड वाढ झाल्याने पाण्याच्या बाष्पीभवनाचाही वेग वाढला आहे. ‘चित्री’चे पात्र प्रथमच उघडे पडू लागले आहे. पाणीपातळी घटण्याचा वेग पाहून पाटबंधारे विभागाने मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत शेतीकरिता पाणी सोडण्याचे, तर त्यानंतर केवळ पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे.चित्रीतील घटलेल्या पाणीसाठ्याचा परिणाम गडहिंग्लज तालुक्यातील शेती पिकांवरही होणार आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर काही कठोर निर्णय पाटबंधारे विभागाकडून घेतले जाण्याची शक्यता आहे. आजरा तालुक्यातील पश्चिम भागातील इतर यरंडोल तलाव, खानापूर, धनगरवाडी येथेही फारशी वेगळी अवस्था नसली, तरी दोनचार जोरदार वळीव पाऊस झाल्यास त्या भागातील पाणीप्रश्न संपुष्टात येऊ शकतो, असे असले तरी या गोष्टी जर-तर वर अवलंबून असल्याने यावर्षी पाणीटंचाईला सामोरे जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही. (प्रतिनिधी)