लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोईमतूर येथे झालेल्या विसाव्या जे के टायर नॅशनल चॅम्पियनशिप फॉर्म्युला एफबीओ चारचा राउंड एक मध्ये कोल्हापूरच्या चित्तेश मंडोडीने १ मिनिट १० सेकंदांचा विक्रमी विजय मिळवीत प्रथम क्रमांक पटकाविला. रेसिंगमधून मोठा ब्रेक घेतल्यानंतर त्याला बंगलोरची टीम अॅवलांज यांनी करारबद्ध केले. ही टीम माजी रेसिंग ड्रायव्हर फझल खान यांच्या मालकीची आहे. या स्पर्धेत तीन फेऱ्यांमध्ये चित्तेश यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना अॅवलांज संघाचे फजल खान, मोहिते रेसिंग अकॅडमीचे शिवाजी मोहिते, अभिषेक मोहिते, सचिन मंडोडी यांचे मार्गदर्शन लाभले.
चित्तेशची बाजी
By admin | Updated: July 12, 2017 00:54 IST