शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

चिंचवाडकरांना मिळाली दिवाळीची अनोखी भेट

By admin | Updated: November 14, 2015 00:20 IST

पेयजल योजनेचे उद्घाटन : पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गावकऱ्यांना शुद्ध पाणी

संतोष बामणे- जयसिंगपूर -चिंचवाड (ता. शिरोळ) येथील गेल्या पाच वर्षांपासून राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम संथगतीने सुरू होते. मात्र, पाण्याच्या टाकीच्या जागेचा वाद संपुष्टात येत काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. चिंचवाड व हाळचिंचवाडमधील नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी मिळाले. यामुळे पाच वर्षांची शुद्ध पाण्याची प्रतीक्षा संपली आहे. दिवाळी-पाडव्यादिवशी पेयजल योजनेचे उद्घाटन झाले.चिंचवाड हे कृष्णा नदीकाठावरील गाव असून, या गावची लोकसंख्या पाच हजारांहून अधिक आहे. या ठिकाणी जुनी मोडकळीस आलेली पाणीपुरवठा योजना कार्यरत आहे. तसेच जलशुद्धिकरण यंत्रणा नसल्यामुळे गावाला अशुद्ध पाणीपुरवठा होतो. ग्रामपंचायतीकडून पाण्यात शुद्धिकरण पावडर टाकूनही ते स्वच्छ होत नव्हते. पावसाळ्यात आरोग्याचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर येत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. २०१० साली तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या पाठपुराव्यामुळे गावाला राष्ट्रीय पेयजल योजना मंजुरी झाली होती. यासाठी एक कोटी ५९ लाखांचा निधी गावाला उपलब्ध झाला. योजना उभारण्यासाठी ग्रामपंचायतीकडे राखीव जागा उपलब्ध नसल्यामुळे अडचणी येत होत्या. चिंचवाड-शिरोळ रस्त्यालगत सहा गुंठे जागा ग्रामपंचायतीने विकत घेऊन त्याठिकाणी योजना राबविण्याचा निर्णय घेतला. २०१२ साली प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. या-ना त्या कारणाने काम संथगतीने सुरू होते. गावातील नेत्यांनी एकत्र येऊन काम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला. सध्या पेयजल योजनेच्या चिंचवाडात व हाळचिंचवाड येथे ६५ हजार लिटरच्या दोन अद्ययावत टाक्या उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे हाळचिंचवाडमधील पाण्याचा प्रश्न निकालात निघाल्याने समाधान व्यक्त होत आहे. काम शंभर टक्के पूर्ण झाले असून उद्घाटन उत्साहात झाले. ग्रामपंचायतीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे राष्ट्रीय पेयजल योजना पूर्ण झाली असून, सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधून गावाच्या विकासात राजकारण नको अशी ठाम भूमिका घेऊन हा रेंगाळलेला प्रश्न सोडवून गावाच्या विकासात चालना देण्याचे काम केले असून आता गावाला शुद्ध पाणी उपलब्ध झाले आहे. - प्रमोद चौगुले, ग्रामपंचायत सदस्य, चिंचवाडगेल्या पाच वर्षांपासून चिंचवाड पेयजल योजनेचा प्रश्न संथगतीने सुरू होता. मात्र, गावच्या विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे जाऊन पदाधिकाऱ्यांनी काही अडचणी होत्या त्या दूर करून राष्ट्रीय पेयजल योजनेचा प्रश्न निकाली काढला आहे. - प्रेमानंद उदगावे, सामाजिक कार्यकर्ते, चिंचवाड.