शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मिरचीचा ठसका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:02 IST

कोल्हापूर : गतवर्षीपेक्षा यंदा लाल मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. त्यातच चटणीसाठी लागणाऱ्या मसाल्याच्या साहित्यदरामध्ये कमालीची वाढ झाल्याने ग्राहकांना मिरचीचा ठसका लागला आहे. लिंबूच्या दरातही वाढ झाली आहे. दहा रुपयांना पाच लिंबू असा दर होता. भाज्यांची आवक वाढल्याने दरावर परिणाम झाला आहे. पण, तीन दिवसांपूर्वी झालेल्या वळवाच्या पावसाचा दणका द्राक्षांसह ...

कोल्हापूर : गतवर्षीपेक्षा यंदा लाल मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. त्यातच चटणीसाठी लागणाऱ्या मसाल्याच्या साहित्यदरामध्ये कमालीची वाढ झाल्याने ग्राहकांना मिरचीचा ठसका लागला आहे. लिंबूच्या दरातही वाढ झाली आहे. दहा रुपयांना पाच लिंबू असा दर होता. भाज्यांची आवक वाढल्याने दरावर परिणाम झाला आहे. पण, तीन दिवसांपूर्वी झालेल्या वळवाच्या पावसाचा दणका द्राक्षांसह फळांना बसला आहे. द्राक्षांची आवक कमी झाल्याने ती प्रतिकिलो ८० रुपयांच्या घरात जाऊन पोहोचली आहेत.रविवारच्या आठवडी बाजारात लाल मिरची (ब्याडगी)चा प्रतिकिलो दर २२० रुपये, तर जवारी १६० रुपये आहे. यंदा दरामध्ये सुमारे २० टक्के वाढ झाली आहे. चटणी करण्यासाठी लागणाºया साहित्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे. मसाल्याच्या विविध साहित्याचे दर १०० रुपयांपासून ते ५०० रुपये आहेत. तसेच शेंगतेल व सरकी तेलामध्ये वाढ झाली आहे. शेंगतेलात चार रुपयांनी वाढ होऊन ते १२४ रुपये प्रतिकिलो, तर सरकीत दोन रुपयांची वाढ होऊन ते ९० रुपये झाले आहे. गेल्या आठवड्यात सरकीमध्ये तब्बल आठ रुपयांची वाढ झाली. बहुतांश ग्राहक सरकी तेल घेतात. या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, दुसरीकडे तांदूळ, गहू, ज्वारी, साखरेचे दर स्थिर आहेत.भाज्यांची आवक वाढल्याने दरावर परिणाम झाला आहे. टोमॅटो प्रतिकिलो पाच रुपये, गवार २५ रुपये, ओला वाटाणा ४५ रुपये, कारली व भेंडी १५ रुपये, तर मेथीची पेंढी, पालक व शेपूचा दर स्थिर होता.फळबाजार असामोसंबी चुमडे ७०० रुपये, संत्री कॅरेट ८०० रुपये, चिक्कू शेकडा ३०० रुपये, डाळिंब ४५ रुपये किलो, अंजीर ५० रुपये, अननस २० रुपये, तर आंबा (हापूस) ४०० रुपये, तर पायरी २५० रुपये असा बॉक्स होता.काकडीची आवक वाढलीउन्हाळ्यात कलिंगड, द्राक्षांबरोबर काकडीलासुद्धा ग्राहकांकडून जास्त मागणी असते. गेल्या आठवड्यात काकडीचा दर प्रतिकिलो २० रुपये होता; पण या आठवड्यात काकडीची आवक वाढल्याने त्याचा दरावर परिणाम झाला. ती १५ रुपयांजवळ गेली होती.लसूण उतरलादैनंदिन भोजनासाठी नेहमी वापरात असणाºया लसणाच्या दरात उतरण झाली आहे. लसणाचा प्रतिकिलोचा दर २५ रुपये असा होता. त्यामुळे लक्ष्मीपुरीतील आठवडी बाजारात लसूण घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होती.