शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘ओकजा’ चित्रपटाला चिल्लर पार्टीचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 18:27 IST

सुधाकरनगर झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांचा सहभाग

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि.२३ : चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीतर्फे चालणाऱ्या बालचित्रपट चळवळीअंतर्गत रविवारी दक्षिण कोरियाचा ‘ओकजा’ हा चित्रपट दाखविण्यात आला. हा चित्रपट पाहण्यासाठी बच्चेकंपनीने शाहू स्मारक भवन येथे गर्दी केली. महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या सुधाकर नगर परिसरातील बालदर्शक या चित्रपटाला आवर्जून उपस्थित होते.

लहान मुलांमध्ये देश-विदेशातील चित्रपट पाहण्याची आवड जोपासावी म्हणून दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीमार्फत बालचित्रपट दाखविण्यात येतात. या उपक्रमांतर्गतच ‘ओकजा’ हा चित्रपट दाखविण्यात आला. १९ मे २0१७ रोजी प्रदर्शित झालेला दक्षिण कोरियाच्या या अ‍ॅक्शन आणि साहसी चित्रपटातून पर्यावरण कार्यकर्त्याची झुंज आणि त्याला एका शेतकऱ्याच्या मुलीने दिलेली साथ यांचा प्रवास मांडला आहे. एका प्रयोगाने डुकरांची २६ पिल्ली तयार करून ती वेगवेगळ्या देशांत पाळण्यासाठी पाठविली जातात. कोरियातील एका शेतकऱ्याकडे पाठविण्यात आलेल्या डुकराची शेतकऱ्याच्या मिजा या दहा वर्षांच्या मुलीशी जिवाभावाची मैत्री होते. मात्र संबंधित कंपनीकडून ओकजाचा वापर करून प्रयोगशाळेत या प्राण्यांवर कसा अन्याय केला जातो हे सत्य जगासमोर आणण्याचा प्लॅन प्राणिमित्र संघटनेकडून केला जातो. मात्र कंपनीच्या कत्तल करण्याच्या कचाट्यात ओकजा सापडते. ओकजाला सोडविण्यासाठी मिजा या कंपनीसोबत लढा देते, असे या चित्रपटाचे कथानक आहे.

बाँग जून हो यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची बाँग आणि जॉन रोनसन यांची पटकथा आहे. दक्षिण कोरियाची बालकलाकार आन स्यू ह्यूनची यात प्रमुख भूमिका आहे. याशिवाय हॉलिवूडच्या गाजलेल्या अभिनेत्यांची यात भूमिका आहे. २0१७ च्या कान्स फिल्म फेस्टिव्हल्समध्ये हा चित्रपट मुख्य चित्रपटांच्या स्पर्धेत होता.

चिल्लर पार्टीच्या या उपक्रमात दरवेळेस सुधाकरनगर झोपडपट्टीतील मुलांचाही सहभाग असतो. याहीवेळेस ही लहान मुले आवर्जून हा चित्रपट पाहण्यासाठी उपस्थित होते.