शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

‘त्या’ बालकाचा अद्यापही ठावठिकाणा लागला नाही

By admin | Updated: March 2, 2015 00:22 IST

अपहरण प्रकरण : संशयित फिरस्त्यांना चौकशी करून सोडून दिले

कोल्हापूर : टाऊन हॉल बागेत खेळत असलेल्या दोन वर्षांच्या बालकाचे अपहरण केल्याच्या संशयावरून लक्ष्मीपुरी पोलिसांनी दोन फिरस्त्या महिलांसह चौघांना शनिवारी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे चौकशी केली असता बालकासंदर्भात त्यांच्याकडे कोणतेच धागेदोरे मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांना अखेर सोडून दिल्याचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ पांचाळ यांनी सांगितले. दरम्यान, गेले सतरा दिवस गायब झालेल्या पोटच्या मुलाच्या विरहाने आई-वडील खचून गेले आहेत. टाऊन हॉल बागेत दि. १६ फेब्रुवारीला फरान ऊर्फ आयान अकिब जांभारकर (रा. सिद्धार्थनगर) हा मुलगा अन्य मुलांसोबत खेळत असताना भरदुपारी त्याचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी शहरात सर्वत्र चौकशी केली असता, त्याला जळकी राणी या नावाने परिचित असणाऱ्या फिरस्त्या महिलेने पळवून नेल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी मिरज, पंढरपूर, सोलापूर, पुणे आदी रेल्वे स्टेशन परिसरातील भिकाऱ्यांकडे चौकशी केली असता तो मिळून आला नाही. संशयावरून शहरातील वैशाली जाधव, अनिल जाधव, सोनाली पुणेकर, दीपक पुणेकर या फिरस्त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांनी जळकी राणी या महिलेस बालकाला घेऊन जाताना आम्ही पाहिल्याचे सांगितले. त्यानंतर ती कुठे गेली, हे आम्हाला माहीत नसल्याचे सांगितले. तसेच गांधीनगर येथील एका महाराजाच्या सांगण्यावरून तिने बालकास पळवून नेल्याचेही त्यांनी सांगितल्याने पोलिसांनी महाराजाला रात्रीच ताब्यात घेऊन चौकशी केली असता ती महिला गांधीनगर येथे फिरत होती. तिच्याशी आपली ओळख आहे. परंतु गेल्या दीड महिन्यांपासून तिची भेट झाली नसल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे पोलिसांनी महाराजासह चौघा फिरस्त्यांना सोडून दिले. जळकी राणी या महिलेची पोलिसांनी शहरातील फुटपाथसह कसबा बावडा शुगर मिल, शिये, शिरोली एमआयडीसी, आदी ठिकाणी शोधमोहीम सुरू ठेवली