शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बाल हक्क संरक्षण विभागाची पदे रिक्त : सरकारचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:22 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाची पदेच गेल्या काही वर्षांपासून रिक्त असल्यामुळे बाल हक्काचे संरक्षण कसे होणार,

ठळक मुद्देबाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापुरात येत आहेत.नव्याने आलेल्या नियमावलीनुसार या रिक्त पदांची संख्या आणखीनच वाढणार आहे. या योजनेंतर्गत मिळणारे अनुदानही गेल्या दोन वर्षांपासून मिळालेले नाही

संदीप आडनाईक ।कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाची पदेच गेल्या काही वर्षांपासून रिक्त असल्यामुळे बाल हक्काचे संरक्षण कसे होणार, असा सवाल या क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्था आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. बाल दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यात येणाºया बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांनी या समस्यांचे निराकरण केल्यास अनेक योजना मार्गी लागणार आहेत.

बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापुरात येत आहेत. जिल्ह्यातील बाल विकासासाठी त्यांनी काही ठोस निर्णय घेतल्यास बाल विकास सक्षमीकरणाचे एक पाऊल पुढे पडेल.कोल्हापूर जिल्ह्यात मुलांसाठी दोन आणि मुलींसाठी एक निरीक्षणगृह कार्यरत आहे. या तीनही निरीक्षणगृह संस्थेत अधीक्षक पद रिक्त आहे. जिल्ह्यातील या तीनही निरीक्षणगृह संस्थेत पूर्ण वेळ निवासी अधीक्षक उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांची आहे.

कोल्हापूर शहरात दोन निरीक्षणगृह कार्यरत आहेत. यापैकी १00 मुलांची मान्यता असणाºया निरीक्षणगृह संस्थेत बहुतांश कर्मचाºयांची पदे रिक्तच आहेत. खरे म्हणजे यातील बरीच पदे मंजूरही आहेत. परंतु, केवळ तांत्रिक कारणांमुळे ती अनेक वर्षे भरण्यात आलेली नाहीत.

या संस्थेत मंजूर असलेल्या १६ पदांपैकी ११ पदे रिक्त आहेत. ७५ मुलींसाठी असलेल्या निरीक्षणगृह संस्थेतही हीच परिस्थिती आहे. या संस्थेसाठी १२ पदे मंजूर आहेत, परंतु त्यातील ७ पदे अजूनही रिक्तआहेत जुन्या मान्यतेनुसार ही पदे रिक्त आहेत, त्यामुळे नव्याने आलेल्या नियमावलीनुसार या रिक्त पदांची संख्या आणखीनच वाढणार आहे. त्यामुळे तातडीने ही रिक्त पदे भरण्याची गरज आहे. तसे झाल्यास अनेक योजना मार्गी लागणार आहेत.बालसंगोपन योजनेंतर्गत अनुदानात वाढ हवीकुटुंब आधारित संगोपन या तत्त्वानुसार राज्य सरकारने बालसंगोपन नावाने एक योजना १९७५ मध्ये सुरू केली होती. या योजनेत काळानुसार बदल होत गेले. मात्र, आजही ही योजना सुरू आहे. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील सुमारे साडेचारशे बालकांना या योजनेंतर्गत लाभ देण्यात आलेला नाही. या योजनेंतर्गत मिळणारे अनुदानही गेल्या दोन वर्षांपासून मिळालेले नाही. या बालसंगोपन योजनेंतर्गत लाभार्थ्यांना नियमितपणे दरमहा अनुदान मिळावे, अशी मागणी आभास फौंडेशन या स्वयंसेवी संस्थेने केली आहे. गेल्या बारा वर्षांहून अधिक काळ अनुदानाच्या रकमेतही वाढ करण्यात आलेली नाही, त्यातही वाढ करावी, अशी मागणी या संस्थेने केली आहे.