शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

बालकामगार येताहेत शिक्षणाच्या प्रवाहात

By admin | Updated: April 30, 2015 00:43 IST

बालकामगार विरोधी दिन : १२00 कुटुंबांतील १७00 मुले घेताहेत शिक्षण; ‘अवनि’चे सहकार्य

संदीप आडनाईक - कोल्हापूर  प्रत्येक बालकाला शिक्षण हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे २००९ मध्ये सरकारने ठरविले होते. पाच वर्षांनंतर शिक्षणाचा मूलभूत अधिकार हे चित्र दृश्य स्वरूपात दिसत असले तरी यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य मोलाचे ठरले आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील वीटभट्टीवरील स्थलांतरित मजुरांची शेकडो बालके आजही मूलभूत शिक्षण हक्कांपासून वंचितच आहेत, ही वस्तुस्थिती आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांतील १२०० मजूर कुटुंबांचा ‘अवनि’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार केवळ १७०० मुलेच शिक्षणाच्या प्रवाहात असल्याचे स्पष्ट होते आहे. यातील बहुतांश बालके ही कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षण घेत आहेत, ते केवळ अवनी या संस्थेमुळेच. मात्र, इतर दोन्ही जिल्ह्यांत अशा प्रकारची काम करणारी कोणतीही स्वयंसेवी संस्था पुढे आली नसल्यामुळे या दोन जिल्ह्यांतील शिक्षणापासून वंचित असणाऱ्या बालकांची संख्या आणखीन जास्त असण्याची शक्यता आहे.‘अवनि’ या संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी यासंदर्भात माहिती दिली. अवनी संस्थेने वीटभट्टीवरील कामगार, स्थलांतरित ऊसतोड कामगार, बांधकाम व्यवसायातील स्थलांतरित मजूर आणि महामार्गावरील धाब्यावरील बालकामगारांचे सप्टेंबर महिन्यात सर्वेक्षण केले होते. यामध्ये ० ते ३ वयोगटातील आणि ६ ते १४ वयोगटातील शिक्षणापासून वंचित असणारे १७०० बालकामगारांची नोंद झाली आहे. या सर्वच बालकांना अवनी संस्थेने त्यांच्या बालगृहात तसेच संबंधित ठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यासंदर्भात पुढाकार घेतला. यासंदर्भात आॅक्टोबर महिन्यात अवनी संस्थेने त्यांना प्रवेश मिळवून देण्यात यश मिळविले. आता यातील काही बालकामगार जिल्हा परिषदेच्या वाकरे, दोनवडे, खुपिरे, सरनोबतवाडी तसेच शिरोळ तालुक्यातील उदगाव आणि चिंचवाड येथील शाळेमध्ये शिकत आहेत. ० ते ३ वयोगटातील बालकामगारांच्या शिक्षणासाठी ‘अवनी’ संस्थेने कोल्हापूर जिल्ह्यातील ३४ ठिकाणी हंगामी बालवाड्या सुरू केल्या आहेत. यामध्ये ७०० मुले शिक्षण घेत असल्याची माहिती अवनी संस्थेचे कार्यकर्ते साताप्पा मोहिते यांनी दिली.साखरशाळांनाही प्रतिसादअवनि संस्थेने सुरू केलेल्या साखरशाळांनाही प्रतिसाद मिळाला आहे. कसबा बावडा येथील राजाराम सहकारी साखर कारखाना परिसरातील ४५ आणि कुडित्रे येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना परिसरात ६ ते १४ वयोगटातील ४७ बालकांनी या हंगामी साखरशाळांमध्ये शिक्षण घेतले.