शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘चिकोत्रा’त पाणी सोडणार

By admin | Updated: October 4, 2015 00:47 IST

धोक्यात आलेल्या पिकांसाठी पाण्याची दोन आवर्तने

कोल्हापूर : चिकोत्रा धरणात ४८ टक्के पाणीसाठा आहे. त्यातील बाष्पीभवन तसेच अन्य कारणांनी वाया जाणारे पाणी वगळता २५० ते ३०० दक्षलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या खोऱ्यातील धोक्यात आलेल्या पिकांसाठी पाण्याची दोन आवर्तने करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी (दि. २) जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समितीच्या बैठकीत दिले. गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या सभागृहात चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार हसन मुश्रीफ उपस्थित होते. चिकोत्रा खोऱ्याला दोन आवर्तने दिल्यानंतर जे पाणी शिल्लक राहील, ते पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेशही यावेळी पालकमंत्र्यांनी दिले. पाण्याअभावी चिकोत्रा खोऱ्यातील ऊसपीक धोक्यात आले आहे. पिकांना वाचविण्यासाठी पाणी सोडण्याची गरज असल्याचे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले. तीन दिवसांपासून चिकोत्रा परिसरातही दमदार पाऊस सुुरू आहे. यामुळे पिकांना काहीसे जीवदान मिळाले आहे. त्यामुळे महिन्याभरानंतर पाण्याचे आवर्तन करण्याचाही निर्णय झाला. या परिसरातील उसाची तोड प्राधान्यक्रमाने केली जाईल, त्याबाबत साखर कारखान्यांना सूचना द्याव्यात. तसेच यापुढे ऊसाची लागवड करू नये, असा निर्णयही घेण्यात आला. दौलत कारखान्याच्या कर्जास हप्ते घालून देण्याची मागणीही मुश्रीफ यांनी केली. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता एस. डी. साळुंखे, कार्यकारी अभियंता विजय पाटील, एस. एम. चव्हाण उपस्थित होते. (प्रतिनिधी)