शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ३२ मतदारांसाठी निवडणूक यंत्रणा चिक्केवाडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 01:07 IST

प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्वांत कमी मतदारसंख्येचे गाव म्हणून भुदरगड तालुक्यातील चिक्केवाडीची नोंद आहे. ...

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यातील सर्वांत कमी मतदारसंख्येचे गाव म्हणून भुदरगड तालुक्यातील चिक्केवाडीची नोंद आहे. येथे फक्त ३२ मतदान असून; त्यासाठी निवडणूक यंत्रणा या गावात नेली जाते तरीही पूर्ण क्षमतेने मतदान होत नाही. लोकप्रतिनिधींसह नेत्यांच्या दुर्लक्षामुळे मतदानाबाबत अनास्था दिसत आहे.गारगोटीपासून ५० किलोमीटरवर रांगणा किल्ल्याच्या पायथ्याला हे गाव आहे. पाटगावच्या जंगलातील अतिदुर्गम असलेले हे गाव कोकण व घाटमाथ्याच्या नैसर्गिक सीमेवर आहे. १0 कि.मी.पेक्षा जास्त अंतर असलेल्या तांब्याच्यावाडी या ग्रुप ग्रामपंचायतीचे हे गाव एक भाग आहे. गावात चार-पाचच घरे आहेत. तीही गवत, मातीची खुपटी. येथे एकूण ३२ मतदार आहेत. यातील तरुण पोटापाण्यासाठी शहरात कामाला असल्याने गावात वयस्कर मंडळीच दिसतात. त्यांचा उदरनिर्वाह म्हैसपालनावर अवलंबून आहे. गावात मोजकीच कामे झाली आहेत. यामध्ये सौरऊर्जेचा समावेश आहे. वनविभागाच्या कायद्यामुळे इतर विकासकामे करताना अडचणी येत आहेत; त्यामुळे येथे विकासाला गती लागलेली दिसत नाही.गाव अतिदुर्गम असल्याने येथे लोकप्रतिनिधींचाही वावर कमी आहे. ३२ मतांसाठी ५० कि.मी.ची पायपीट करण्याची कोणाचीही मानसिकता दिसत नाही. निवडणुकीची यंत्रणा येथे येऊन कर्तव्य बजावते. मतदान कमी आहे म्हणून त्यांना अन्य केंद्रांवर मतदानासाठी पाठविण्याऐवजी यंत्रणाच गावात लावली जाते. मतदान पूर्ण होईपर्यंत ते थांबतात, हा निवडणुकीचा इतिहास आहे. यंदाही निवडणूक यंत्रणा येथे कार्यान्वित केली आहे. मतदानाबाबत मात्र येथे अनास्था दिसते. आतापर्यंत सुमारे ६० टक्केच मतदान झाल्याचे दिसते. स्थानिक रहिवाशी मतदानाचा हक्क बजावतात. पोटा-पाण्यासाठी शहरात गेलेले मतदानाकरिता येण्यासाठी उत्सुक नसल्याचे दिसत आहे.मतदान केंद्रावर एक मतदान यंत्रगावात निवडणूक विभागाकडून उभारलेल्या मंडपात मतदान प्रक्रिया पाडली जाणार आहे. मतदान केंद्राध्यक्षांसह पाच कर्मचाऱ्यांची टीम येथे कार्यरत असणार आहे. एका मतदान यंत्रा (ईव्हीएम)वर मतदान होईल. मतदानाच्या चिठ्ठ्याही वाटण्याचे काम पूर्ण झाले आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी सर्व कर्मचारी या ठिकाणी दाखल होणार आहेत.राधानगरी-भुदरगड मतदारसंघातील चिक्केवाडी गावात जिल्ह्यातील सर्वांत कमी म्हणजे ३२ इतके मतदान आहे. त्यामध्ये १९ पुरुष व १३ महिला मतदारांचा समावेश आहे.मुक्काम पोस्ट चिक्केवाडी! : जिल्ह्यातील सर्वांत कमी मतदारांचे गाव असलेल्या चिक्केवाडीत वीज व पाण्याची व्यवस्था आहे. गावातील मतदान जास्तीत जास्त व्हावे, यासाठी निवडणूक यंत्रणा प्रयत्नशील आहे. ‘लोकमत’ने बुधवारी या गावास भेट दिली.