शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्ष बदलाची कोंडी फुटेना

By admin | Updated: May 25, 2015 00:37 IST

गडहिंग्लज पालिका : शिंदे-गुरव यांच्यात ‘एकमत’ होत नाही; निवडीसाठी हसन मुश्रीफ यांची कसोटी

राम मगदूम- गडहिंग्लज -नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्या ज्येष्ठ नगरसेविका अरुणा शिंदे व सरिता गुरव यांच्यात एकमत होत नसल्यामुळे गडहिंग्लज पालिकेच्या राजकारणात मोठीच कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे नगराध्यक्ष बदलण्याची कोंडी कशी फोडायची, असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांचीच कसोटी लागली आहे.नगरपालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादीचे नऊ, तर विरोधी जनतादल-जनसुराज्य-काँगे्रस आघाडीचे आठ नगरसेवक आहेत. काठावरील बहुमतामुळे नगराध्यक्ष निवडीसह विषय समित्यांच्या सभापती निवडीवेळी आतापर्यंत नेत्यांचीच कसोटी लागली. तशीच परिस्थिती आताही निर्माण झाली आहे.पहिल्या टप्प्यातील अडीच वर्षांसाठी खुल्या गटातील महिलेसाठी आरक्षित नगराध्यक्षपदी मंजूषा किरण कदम यांना संधी देण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपद इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे.दुसऱ्या टप्प्यात पहिल्यांदा लक्ष्मी बाळासाहेब घुगरे यांना संधी देण्यात आली. त्याचवेळी इच्छुक असलेल्या शिंदे व गुरव यांना उर्वरित कालावधीत दहा-दहा महिने संधी देण्याची ग्वाही देऊन तोडगा काढण्यात आला; परंतु पहिल्यांदा ‘आपण’च या भूमिकेवर दोघीही ठाम असल्यामुळेच ‘घोडे’ अडले आहे.विद्यमान नगराध्यक्षा घुगरे यांनी आपली मुदत संपल्यामुळे नगराध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे दिला आहे. शिंदे व गुरव यांच्यात एकमत झाल्यानंतरच त्यांचा राजीनामा मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा, असे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांची बैठक घेऊन शिंदे व गुरव यांच्यात एकमत घडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघींनीही नेते मुश्रीफ सांगतील ते आपणास मान्य असेल, असे सांगितले आहे. मात्र, काही झाले तरी पहिली संधी आपल्यालाच मिळाली पाहिजे याच मुद्यावर दोघीही ठाम आहेत, असे समजते.घुगरे यांना मुदतवाढ ?अडीच वर्षांनंतर झालेल्या नगराध्यक्ष निवडीवेळी विरोधी आघाडीने केलेल्या सत्तांतराच्या मोेर्चेबांधणीमुळे बहुमत असूनही आमदार मुश्रीफ यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांची मोठी दमछाक झाली. त्यावेळी दस्तुरखुद्द मुश्रीफ यांनी स्वत: लक्ष घालून विरोधकांची ‘खेळी’ उधळून लावल्यामुळे राष्ट्रवादीची सत्ता वाचली. त्यामुळे यावेळी ‘धोका’ पत्करण्याची त्यांची मानसिकता नाही. त्यामुळे शिंदे व गुरव यांच्यात एकमत न झालेस विद्यमान नगराध्यक्षा घुगरे यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.