कोल्हापूर : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उद्या, रविवारी कोल्हापुरात येत आहेत. त्याचबरोबर राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे ही या कार्यक्रमाला येत आहेत. मुख्यमंत्री चव्हाण यांचे उद्या सकाळी १०.४५ वाजता कऱ्हाडहून कोल्हापूर विमानतळ येथे आगमन होईल. शाहू मार्केट यार्ड येथे अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आयोजित राष्ट्रीय अधिवेशनास ते उपस्थित राहतील. यानंतर दुपारी १२.३० वा. शासकीय विश्रामगृह येथे जाणार आहेत. येथे दुपारी १.१५ पर्यंत ते थांबणार असून, ही वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. १.३० वा. विमानाने ओझरला जाणार आहेत. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री आज कोल्हापुरात
By admin | Updated: August 3, 2014 01:48 IST