शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा

By admin | Updated: November 5, 2015 00:39 IST

ऊस दर प्रश्न : शेट्टी यांची सहकारमंत्र्यांकडे मागणी

कोल्हापूर : साखरेचे बाजारपेठेतील दर पाहिले तर एकरकमी एफआरपी देण्यासाठी कारखान्यांना कोणतीच अडचण नाही. तरीही कारखानदार भूमिका जाहीर करीत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. कारखानदार व शेतकरी यांच्यातील संघर्ष विकोपाला जाण्याची शक्यता असल्याने यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करून बैठक बोलवावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली आहे.कायद्याप्रमाणे एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे; पण कारखानदारांनी सर्वसाधारण सभेत बेकायदेशीर ठराव करून तीन टप्प्यांत एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेने १६ आॅक्टोबरला प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढून कारखानदारांसह सरकारला इशारा दिला आहे. सध्या काही कारखाने सुरू आहेत, ते बंद पाडण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत, तर अनेक कारखानदारांची निर्णय होईपर्यंत गाळप न करण्याची भूमिका आहे. सरकारने हे करावेउसावरील खरेदी कर माफ करावाराज्य बॅँकेकडून देण्यात येणारी उचल ८५ वरून ९० टक्के करावी. आगामी साखरेच्या बाजार भावाचा अंदाज घेता बॅँकेने २६०० ते २७०० रुपयांपर्यंत मूल्यांकन धरावे.यातून एफआरपी देण्यासाठी कमी पडणारी रक्कम कर्नाटकच्या धर्तीवर कर्जास हमी द्यावी.गत हंगामातील एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यांना पुढील पंधरा वर्षे निवडणूक लढविण्यास प्रतिबंध करावा. तिथे आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नेमणूक करावी.