शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री शेतकऱ्यांना विसरले : शेट्टी

By admin | Updated: April 30, 2017 01:12 IST

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा : २०१४ च्या निवडणुकीतील आश्वासन पंतप्रधानांनी पाळावे

आजरा : विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्येस सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर ३०२ कलम दाखल करा म्हणणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यानंतर मात्र शेतकऱ्यांना विसरले आहेत. तीच अवस्था पंतप्रधानांची आहे. २०१४ च्या निवडणुकीत पंतप्रधानांनी दिलेले आश्वासन पाळावे व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी आजरा येथे पत्रकार बैठकीत केले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्यावतीने कर्जमुक्तीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मोटारसायकल रॅलीच्या निमित्त खा. शेट्टी बोलत होते.खा. शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार का? असा प्रश्न मुख्यमंत्री उपस्थित करीत आहेत, पण किमान अत्यंत गांजलेल्या परिस्थितीत असणाऱ्या शेतकऱ्याला दिलासा तरी द्यावाच लागेल. सातत्याने शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचे संकट येत आहे. वैश्विक तापमानात झालेली वाढ, निसर्गाची छेड काढून उभारलेली सिमेंटची जंगले, यांच्याशी काहीही संबंध नसताना शेतकरी त्याचे परिणाम भोगत आहे. समृद्ध समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातही शेतकरी आत्महत्या करू लागला आहे. विविध कारणांनी शेतीमालाचे भाव सातत्याने कोसळत आहेत. महाराष्ट्रातील साडेसहा लाख शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीचे फॉर्म स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भरून घेतले आहेत. १२० कोटी जनतेची भूक मिटवण्याकरिता शेतात राबून देशसेवा करणाऱ्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे. त्याच्या शेतमालाला हमीभाव मिळावा व साठ वर्षे पूर्ण झालेल्या शेतकऱ्याला वृद्धापकाळात पेन्शन मिळावी, अशी आपली भूमिका आहे. तसे ठराव येत्या ग्रामसभेत महाराष्ट्राभर केले जाणार आहेत. अद्याप उसाच्या उर्वरित ५०० रुपयांचा प्रश्नही कायम आहे. चार तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून या प्रश्नाचा पाठपुरावा केला जाणार आहे. (प्रतिनिधी)सदाभाऊ संघटना सोडणार नाहीतराज्यमंत्री सदाभाऊ खोत भाजपच्या वाटेवर आहेत, असे समजल्याबद्दल खा. शेट्टी यांना विचारल्यानंतर सदाभाऊ संघटनेत वाढले आहेत. ते भाजपमध्ये जातील, असे वाटत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षच शेतकऱ्यांच्या बाजूनेकाल शेतकऱ्यांच्या बाजूने असणारे विरोधी पक्ष सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना विसरले, तर सत्तेत असणारे; परंतु सध्या विरोधात असणारे विरोधी पक्ष सत्ता गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षच नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने असतो, अशी टिप्पणीही खा. शेट्टी यांनी केली.