शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवाजी चौकाचे लवकरच सुशोभीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2016 00:58 IST

ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार : एक कोटींचा निधी मंजूर; सहा महिन्यांत काम पूर्ण करणार

कोल्हापूर : स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचा, चळवळी आणि लढ्यांचा साक्षीदार बनलेल्या मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे लवकरच सुशोभीकरण करण्यात येणार असून, त्याकरिता एक कोटींचा निधी, तसेच महानगरपालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितली. येत्या १५ दिवसांत सुशोभीकरणाचे काम सुरू करून सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.सध्याच्या आराखड्याप्रमाणे सुशोभीकरणास एक कोटी रुपये खर्च येणार असला तरी जनतेच्या या शक्तिस्थळास ऐतिहासिक रूप देताना आणखी काही निधी लागला तरी तो देण्याची आपली तयारी आहे. कामास निधी कमी पडून देणार नाही, अशी ग्वाहीही आमदार क्षीरसागर यांनी यावेळी दिली. महापौर हसिना फरास यांनी महानगरपालिकेवर जी जबाबदारी पडेल ती पूर्ण केली जाईल. या कामास महापालिकेचे संपूर्ण सहकार्य राहील, असे सांगितले. आमदार क्षीरसागर यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून चौकाची दुरवस्था झाली आहे. पुतळ्याभोवती असणारे लोखंडी कठडे तुटलेले आहेत. अनेक लढ्यांचे, तसेच युवकांचे स्फूर्तिस्थान असलेल्या चौकाच्या दुरवस्थेबाबत शहाजी तरुण मंडळाने आपणाला भेटून निवेदन दिले. तसेच सुशोभीकरणास निधी देण्याची विनंती केली. त्याप्रमाणे आपण हे काम त्वरित हातात घेतले. उद्योगमंत्री सुभाष देसाई व खासदार अनिल देसाई यांनी ५० लाखांचा निधी दिला असून, उर्वरित ५० लाखांचा निधी आपल्या आमदार फंडातून दिला जाणार आहे.असे असेल सुशोभीकरणसध्याची स्मारकाची उंची १३ फूट असून, ती १६ फुटांपर्यंत वाढविणार.चबुतरा ग्रॅनाईडमध्ये करण्यात येईल व त्यास ज्योतीसारखा आकार असेल.चबुतऱ्याच्या पुढील भागावर शिवमुद्रा असेल. ट्राय कलरमध्ये (तीन रंगांत) लाईट इफेक्ट असेल. ४पुतळ्याच्या मागील बाजूने धातूची मजबूत व गोलाकार भिंत असेल.४ भिंतीवर छत्रपतींचा थोडक्यात मराठी व इंग्रजीमध्ये इतिहास लिहिलेला असेल. ४या स्मारकाच्या उजव्या बाजूला प्रतीकात्मक एक मावळा असेल.४ स्फूर्तिस्थळ, स्मारक त्याचबरोबर पर्यटनस्थळ म्हणूनही विकसित होईल. शिवराज्याभिषेक दिन ६ जूनला शिवराज्याभिषेक दिन सोहळासाजरा करण्यात येणार आहे. छत्रपतींचा इतिहास पुन्हा एकदा जनतेसमोर मांडण्याचा आपला प्रयत्न राहील. नवीन सुशोभीकरणाचे अनावरणही त्याच दरम्यान करण्यात येईल, असे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले.मावळा कोण? नाव सांगा... आर्किटेक्ट सूरज जाधव यांनी शिल्पाची संपूर्ण माहिती दिल्यानंतर पुतळ्याशेजारी एका मावळ्याची प्रतिकृती असणार आहे, असे सांगितले. त्यावर जयदीप शेळके यांनी मावळा कोण असणार? त्याचे नाव जाहीर करा, अशी मागणी केली. त्यावर जाधव यांनी मावळा हा मावळाच असेल, असे मोघम उत्तर दिले. त्यावेळी शेळके यांनी ‘दादोजी कोंडदेव तेथे असता कामा नये’, अशी भूमिका मांडली. यावेळी बंडा साळोखे यांनी तत्काळ विरोध का?अशी विचारणा केली. प्रकरण चिघळेल म्हणून क्षीरसागर यांनी त्यात हस्तक्षेप केला