शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कणेरी मठावर छत्रपती शाहू दालन

By admin | Updated: January 4, 2015 01:19 IST

संस्कृती महोत्सव : प्रदर्शनस्थळी कलाप्रदर्शनाचेही आयोजन

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये कणेरी मठावर भारतीय संस्कृती महोत्सव-२०१५ अंतर्गत काडसिद्धेश्वर स्वामींच्या संकल्पनेतून छत्रपती शाहू दालन साकारले आहे. कोल्हापुरातील कलाकारांच्या २१ प्रकारच्या कलाकृती या दालनात असणार आहेत. अशा पद्धतीचे हे पहिलेच शाहू चरित्र प्रदर्शन भरत असून, हे प्रदर्शन १८ ते २५ जानेवारीपर्यंत सुरू राहील. याचे संयोजन शिवाजी मस्के यांनी केले आहे. प्रदर्शनस्थळीच कोल्हापूर कलापरंपरेचे कला प्रदर्शनही भरविण्यात येत आहे. याचे नियोजन चंद्रकांत जोशी यांनी केले आहे. एकशे साठहून अधिक वर्षांची कलापरंपरा असणारे कोल्हापूर हे एकमेव शहर. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या राजाश्रयाने येथील कला बहरली. कोल्हापूर स्कूलचा नावलौकिकही देशात पसरला आहे. कलातपस्वी आबालाल रहमान, रावबहादूर धुरंधर, दत्तोबा दळवी, बाबूराव पेंटर, चांगदेव शिगावकर, माधवराव बागल, चंद्रकांत मांडरे, गणपतराव वडणगेकर, टी. के. वडणगेकर, गोसावी, रवींद्र मेस्त्री, पी. सरदार, जी. कांबळे यांचा उल्लेख करावा लागेल. त्यानंतरही निसर्ग, व्यक्तिचित्रे, पोस्टर, शिल्प आणि कॅलेंडर असा पाच कलांचा प्रवाह पुढे अखंड सुरू राहिला आहे. कोल्हापूरने परंपरा जपताना बदलत्या काळाबरोबर बदल आत्मसात केले आहेत.