शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2016 01:30 IST

देवेंद्र फडणवीस : विकास निधीच्या मंजुरीचे संभाजीराजे यांना पत्र देवेंद्र फडणवीस : विकास निधीच्या मंजुरीचे संभाजीराजे यांना पत्र

कोल्हापूर : कोल्हापूरच्या विमानतळाची स्थापना छत्रपती राजाराम महाराज यांनी केली आहे. त्यामुळे या विमानतळाला त्यांचे नाव देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. १९) मुंबईत दिले. तसेच भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अपेक्षेनुसार कोल्हापूर विमानतळ विकास आराखड्याच्या खर्चापैकी निर्धारित निधी राज्य शासन देणार असल्याचे पत्र त्यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडे दिले.कोल्हापूर विमानतळाचा विकास, सेवा प्रारंभाबाबत चर्चेसाठी दिल्लीमध्ये मंगळवारी (दि. १८) भारतीय विमानतळ प्राधिकरण व नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातर्फे बैठक घेण्यात आली. यात प्राधिकरणाचे अध्यक्ष गुरुप्रसाद मोहापात्रा यांनी कोल्हापूरचा विमानतळ कार्यरत नसल्याने विकास आराखड्यातील एकूण खर्चाच्या ३० टक्के रकमेचा भार राज्य सरकारने उचलावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. तसेच प्राधिकरणाच्या अपेक्षेनुसार राज्य शासनाने आपल्या हिश्श्याचा वाटा उचलण्याची लेखी विनंती केली. त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्काळ प्रतिसाद देत विमानतळासाठी राज्य शासनाच्या हिश्श्याच्या निधीला तत्त्वत: मंजुरी दिली. शिवाय त्यांनी भारतीय विमान प्राधिकरणाला आम्ही हिस्सा उचलण्यास तयार असल्याचे कळविले. या संदर्भातील लेखी पत्र खासदार संभाजीराजे छत्रपती यांना दिले. (प्रतिनिधी)ठोस कार्यवाहीचे पाऊल याशिवाय विमानतळ विकास आराखड्यातील खर्चाच्या २७४ कोटी रुपयांपैकी राज्य शासनाच्या हिश्श्याची २० टक्के रक्कम देण्याचे पत्र दिले आहे. निधी देण्याबाबतचे अधिकृत पत्र मिळाल्यामुळे विमानतळ विकास व सेवा सुरू करण्याच्या दिशेने ठोस कार्यवाहीचे पाऊल पडले असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. ते म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांच्या करवीरनगरीच्या विकासासाठी निधी कदापि कमी पडू न देण्याचे व यासाठी अजूनही निधी लागला, तर तो दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. कोल्हापूरची विमानसेवा सुरू करण्याबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातर्फे तातडीने परवाना मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहेमुंबईत बुधवारी विमानतळ प्राधिकरणाच्या अपेक्षेनुसार विमानतळ विकास आराखड्यातील खर्चाची रक्कम राज्य शासनाने द्यावी, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिले.