शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळच्या ‘छत्रपती ग्रुप’च्या अध्यक्षाची धुलाई

By admin | Updated: September 15, 2015 01:33 IST

सायबर चौकातील प्रकार : रेल्वेत नोकरीच्या आमिषाने दहा लाखांची फसवणूक; परस्परविरोधी फिर्याद

कोल्हापूर : रेल्वे खात्यात नोकरीचे आमिष दाखवून दहा लाख रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या शिरोळच्या ‘छत्रपती ग्रुप’च्या अध्यक्षाला राजारामपुरी सायबर चौकात तरुणांनी बेदम चोप दिला. प्रमोद सुरेश पाटील (रा. पद्माराजे हौसिंग सोसायटी, उजळाईवाडी, ता. करवीर, मूळ गाव राजापूर, ता. शिरोळ) असे त्याचे नाव आहे. त्याच्यासह अनुप व आणखी दोघांच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी मच्छिंद्र बंडोपंत हांडे (वय ३१, रा. सम्राटनगर) याने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, फिर्यादी मच्छिंद्र हांडे हा प्रॉपर्टी एजंटाचे काम करतो. त्याची संशयित प्रमोद पाटील याच्याशी तोंडओळख झाली होती. त्यातून त्याने मच्छिंद्र व त्याचा मित्र अवधूत देसाई (रा. आर. के. नगर) यांना रेल्वे खात्यात सरकारी नोकरी लावतो, असे सांगत वेळोवेळी दोघांच्याकडून प्रत्येकी दहा लाख रुपये घेतले होते. पैसे देऊनही नोकरी न लावल्याने त्यांनी त्याला विचारणा केली असता त्याने सोमवारी दुपारी दोघांना राजारामपुरी सायबर चौक येथील एका हॉटेलच्या दारात बोलावून घेतले. त्यानंतर त्याने मी तुम्हाला पैसे देत नाही, तुमचे पैसे मी घेतलेले नाहीत, तुम्हाला काय करायचे ते करा, असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या अनुप नावाच्या व्यक्तीने बेसबॉल स्टीकने या दोघांना मारहाण केली. त्यामध्ये या दोघांच्या मांडीवर व कपाळावर गंभीर दुखापत झाल्याने त्यांना जागृतीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या प्रकाराची माहिती त्यांच्या मित्रांना समजताच त्यांनी प्रमोद पाटील याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्यासह चौघांच्या विरोधात जखमी हांडे याने राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी प्रमोद पाटील याच्यासह चौघांच्या विरोधात ४२०, ३२४, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे फसवणूक व मारहाणीचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, प्रमोद पाटील याने अवधूत देसाई व मच्छिंद्र हांडे या दोघांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार दिल्याने पोलिसांनी देसाई व हांडे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला.