शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
3
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
4
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
5
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
6
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
7
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
8
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
9
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
10
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
11
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
12
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
13
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
14
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
15
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
16
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
17
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
18
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
19
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
20
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

अंबाबाई मूर्तीची रासायनिक संवर्धन प्रक्रिया होणारच

By admin | Updated: July 24, 2015 00:53 IST

मार्ग मोकळा : औरंगाबादचे पथक आज कोल्हापुरात

कोल्हापूर : अंबाबाई मूर्तीवर करण्यात येणाऱ्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेला हिंदू जनजागृती समितीने केलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी गुरुवारी पुरातत्त्व खात्याचे महासंचालक राकेश तिवारी यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी तिवारी यांनी पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी ग्वाही दिली. त्यानुसार औरंगाबादचे पुरातत्व विभागाचे पथक आजच शुक्रवारी कोल्हापुरात दाखल होत आहे. त्यामुळे रासायनिक संवर्धनचा मार्ग मोकळा झाला आहे. मूर्तीवर करण्यात येणारी रासायनिक संवर्धन प्रक्रिया अधार्मिक असल्याचे सांगत हिंदू जनजागृती समितीने तिला विरोध करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय पुरातत्व खात्याला पाठविले होते. यामुळे पुरातत्व खात्याचे अधिकारी या प्रक्रियेसाठी बुधवारी आले नव्हते. दरम्यान मूर्तीवरील धार्मिक विधी सुरू केलेले असल्याने ते सुरुच ठेवण्याचा निर्णय श्रीपूजकांनी घेतला होता.श्रीपूजकांनी कालच खासदार महाडिक यांना रासायनिक प्रक्रियेसंबंधी आवश्यक ती कागदपत्रे मेलद्वारे पाठवून ही प्रक्रिया नियोजित वेळेत सुरू होण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती केली होती. त्यानुसार खासदार महाडिक यांनी ‘पुरातत्त्व’चे अधिकारी डॉ. तिवारी यांची भेट घेतली. तिवारी यांनी संवर्धन विभागाचे संचालक जन्वील शर्मा आणि विज्ञान विभागाचे संचालक सक्सेना यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. रासायनिक संवर्धन प्रक्रियेसाठी देवस्थान समितीने पुरातत्त्व खात्याच्या दिल्ली येथील कार्यालयाकडे निधी जमा केला आहे. तो निधी औरंगाबाद विभागाकडे वर्ग करण्याची गरज होती परंतू तो केलाच नाही. आजच शुक्रवारी हा निधी वर्ग केला जाईल. संचालक शर्मा औरंगाबादचे पुरातत्त्व खात्याचे अधिकारी एम.के.सिंग यांना काम सुरू करण्याचे आदेश देतील, असेही चर्चेत ठरले. खासदार महाडिक यांनी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनाही या चर्चेची माहिती दिली. या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर रासायनिक प्रक्रियेला सुरुवात होईल, त्यात कोणताही अडचण नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी न्यायालयाकडे न्यायालयीन आदेशाची पूर्तता व्हावी यासाठी दरखास्त केली आहे. मी गुरुवारी केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या संचालकांची भेट घेतली. रासायनिक प्रक्रिया करण्याची रक्कम केंद्रीय पुरातत्त्व खात्याकडे पाठविण्यात आली आहे. ही रक्कम औरंगाबाद विभागाला वर्ग होऊन रासायनिक प्रक्रियेला दोन-तीन दिवसांत सुरुवात होईल. त्यात कोणतीही अडचण नाही. - धनंजय महाडिक, खासदार आम्हाला रासायनिक संवर्धनासाठी कोल्हापुरात जाण्याचा आदेश अद्याप आला नसला तरी ही तांत्रिक प्रक्रिया शुक्रवारपर्यंत पूर्ण होईल आणि तातडीने आम्हा सातजणांचे पथक कोल्हापूरला रवाना होईल. चिंता करण्याचे कारण नाही. - एम. के. सिंग, औरंगाबादचे पुरातत्त्व खात्याचे अधिकारी