शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
3
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
4
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
5
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
6
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
7
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
8
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
9
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
10
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
11
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
12
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
13
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
14
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
15
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
16
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
17
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
18
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
19
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
20
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाकडून कल्याणमध्ये जल्लोष

By मुरलीधर भवार | Updated: April 4, 2024 21:17 IST

आज उमेदवार घोषित करण्यात आल्याने आनंद साजरा करीत आहे.

कल्याण-भिवंडी लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना उमेदवारी जाहिर झाल्याने आज सायंकाळी कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी आणि उद्धवसेनेकडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी चक्क नृत्य करुन आनंद व्यक्त केला. यावेळी काँग्रेस  कार्यकर्ते या जल्लोषात सहभागी झाले नव्हते.

राष्ट्रवादीचे  जिल्हाध्यक्ष वंडार पाटील यांच्यासह माजी नगरसेवक जे. सी. कटारिया, युवा कार्यकर्ता प्रशांत माळी, शिवसेनेचे दत्तात्रय खंडागळे,वंडार कारभारी आदी यावेळी सहभागी झाले होते. ठाकरे गटाच्या शिवसेना शहर शाखेपासून ढाेलताशांच्या गजरात कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौकात पोहचले. त्यांनी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करीत जल्लोष साजरा केला. जिल्हाध्यक्ष वंडार पाटील यांनी सांगितले की, महाविकास आघाडीचा उमेदवार कधी घोषित होणार याबाबत आम्हाला उत्सुकता लागून होती.

आज उमेदवार घोषित करण्यात आल्याने आनंद साजरा करीत आहे. समोर भाजपचे उमेदवार कपील पाटील यांचे आव्हान असले  तरी महाविकास आघाडीतील तिनही घटक पक्ष एकजूटीने काम करुन सुरेश म्हात्रे यांना विजयी करतील असा विश्वास व्यक्त केला. तसचे या जल्लोषात काँग्रेस सहभागी झाली नाही. काँग्रेसची नाराजी आहे या विषयी विचारणा केली असता पाटील यांनी कोणाचीही नाराजी नसून तिन्ही पक्ष निवडणूकीत दिलेल्या उमेदवाराच्या विजयासाठी काम करतील असे ठामपणे सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याण