शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या आमिषाने सव्वा लाखाची फसवणूक

By admin | Updated: October 1, 2014 01:17 IST

पन्नासजणांचा समावेश : कणेरीवाडी येथील घटना, युवकांकडून तक्रार

कणेरी : नोकरीचे आमिष दाखवून तब्बल ४५ ते ५० जणांची सव्वा लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी अनिल माने (पूर्ण नाव समजू शकले नाही, रा. किर्लोस्करवाडी, जि. सांगली) याच्या विरोधात गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, याबाबत रोहित दिलीप जाधव (वय २२, रा. हुपरी, ता. हातकणंगले) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित अनिल माने याने गत ४ सप्टेंबरला सिक्युरिटी गार्ड, कॉम्प्युटर आॅपरेटर, क्लार्क, आदी पदांसाठी जाहिरात दिली. अनिल माने याने यासाठी कणेरीवाडी (ता. करवीर) येथील यशोदा नगर येथे आॅफिस सुरू केले. जाहिरात वाचून कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील बेरोजगार युवक- युवतींसह पुरुषांनी माने यांच्याशी संपर्क साधला. त्याने ४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या काळात युवक युवतींकडून नोकरीसाठी वेगवेगळ्या पदांसाठी रक्कम घेतली. काही बेरोजगारांकडून २७०० रुपये प्रत्येकी यापैकी दोन हजार फी व सातशे रुपये डिपॉझिट अशा स्वरुपात पैसे घेतले. त्यापैकी दोन हजारांची पावती त्याने दिली. अशा वेगवेगळ्या पदांसाठी ४५ ते ५० जणांकडून त्याने पैसे घेऊन बेरोजगार युवक-युवतींकडून पैसे घेतले व ३० सप्टेंबर रोजी सर्वांना नोकरीचे अपॉर्इंटमेंट लेटर देतो असे सांगितले. त्यांच्या कार्यालयात कणेरीवाडी गावातील स्थानिक दोन महिला कामास होत्यो. दोन दिवस अगोदर त्या कार्यालयातील महिलांकडून कार्यालयातील शिक्के, पावती बूक घेऊन तो गेला. आज, मंगळवारी कणेरीवाडीतील कार्यालयात युवक-युती नोकरीबद्दलचे अपॉर्इंटमेंट लेटर घेण्यासाठी आल्यानंतर त्यांना कार्यालय बंद दिसले. याबाबत अधिक चौकशी केल्यानंतर अनिल माने हा पसार झाल्याचे त्यांना कळले. आपली फसवणूक झाल्याबाबत त्यांनी गोकुळ शिरगाव पोलिसांशी संपर्क साधला. आज, मंगळवारी दिवसभर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यासमोर या युवकांनी गर्दी केली होती. फसवणूक झालेल्यांनी आपल्याकडील अनिल माने यास दिलेल्या पैशांची पावती जमा करून तक्रार दिली. याबाबत अधिक तपास गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे करीत आहेत. (वार्ताहर)