शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चौधरीच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी

By admin | Updated: October 28, 2015 22:59 IST

सादरे आत्महत्त्या प्रकरण : दोन तास युक्तिवाद

नाशिक : जळगाव येथील रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्त्या प्रकरणातील संशयित वाळू ठेकेदार सागर मोतीलाल चौधरी यांच्या अटकपूर्व जामिनावर दोन्ही बाजूच्या वकिलांनी बुधवारी (दि़२८) न्यायालयात दोन तास युक्तिवाद केला़ जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ आऱ कदम यांनी या युक्तिवादानंतर निकाल शुक्रवारपर्यंत राखून ठेवला. या गुन्ह्यातील संशयित सागर चौधरी याच्यावतीने अ‍ॅड. मुकेश शिंपी यांनी सादरे यांच्या सुसाईड नोटमध्ये सागर चौधरीने त्रास दिल्याचे कोठेच म्हटले नसल्याने त्यांच्या अटकेची आवश्यकता नसल्याचे सांगितले़ तर सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील राजेंद्र घुमरे यांनी न्यायालयात सांगितले की, २५ वर्षांच्या कारकीर्दीमध्ये सादरे यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही़ मात्र, जळगावमध्ये गेल्यानंतर गुन्हे दाखल होऊन निलंबनाची कारवाई झाली़ अन्याय सहन करण्याची क्षमता संपली की आत्महत्त्येचा मार्ग निवडला जातो़ पोलीस अधीक्षक सुपेकर, पोलीस निरीक्षक रायते व सागर चौधरी यांनी संगनमताने अशी परिस्थिती निर्माण केली़ सुसाईड नोटमध्ये नाव असलेला चौधरी हा सागरच असल्याने त्यांचा अर्ज नामंजूर करण्याची त्यांनी विनंती केली़ या सुनावणीत न्यायालयाच्या सुचनेवरून तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांनीही तपासाची प्रगती व त्यात संशयित आरोपींचा सहभाग या विषयावर आपली बाजू मांडली. न्यायालयात तब्बल सव्वा दोन तास सुरू असलेला दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून न्यायाधीश कदम यांनी सागर चौधरी याच्या अटकपूर्व जामीनावरील आपला निर्णय शुक्रवार पर्यंत राखून ठेवला. (पान ८ वर)पोलीस निरीक्षक सादरे आत्महत्त्येप्रकरणी अधीक्षक जालिंदर सुपेकर, पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते व वाळू ठेकेदार सागर मोतीलाल चौधरी यांच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे़ यातील संशयित चौधरी यांनी नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात २० आॅक्टोबरला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता़ यावर २६ आॅक्टोबरला दोन्ही पक्षांनी कागदपत्रे सादर केल्यानंतर बुधवारी (दि़२८) युक्तिवाद झाला़ यावेळी न्यायालयात सादरे यांच्या पत्नी माधुरी, मुलगी पूनम न्यायालयात हजर होत्या़(प्रतिनिधी)