शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

आवाडेंच्या चिरंजीवासाठी हाळवणकरांची ^‘शिष्टाई’

By admin | Updated: June 9, 2017 01:17 IST

विजया पाटील यांचा ‘स्थायी’चा राजीनामा; राहुल आवाडेंना संधी

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क   कोल्हापूर : इचलकरंजीतील काँग्रेसचे नेते प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव राहुल यांच्यासाठी त्यांचेच ‘राजकीय विरोधक’ असलेले भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांना ‘शिष्टाई’ करावी लागली आहे. राहुल आवाडे यांना जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीवर संधी देण्यासाठी कबूनर मतदारसंघातील भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या विजया पाटील यांना ‘स्थायी’ समितीचा राजीनामा द्यावा लागला आहे. जिल्हा परिषदेत भाजप, शिवसेना, जनसुराज्य, ताराराणी आघाडी, ‘चंदगड’ची युवा क्रांती आघाडी, आवाडेंची आघाडी, अपक्षांची संयुक्त सत्ता आल्यानंतर २० एप्रिलला झालेल्या विषय समिती सदस्य निवडीवेळी गोंधळ उडाला होता. बिनविरोध झालेल्या सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली. मात्र. त्यांच्या समित्या रात्री निश्चित करण्यात आल्या. अशातच राहुल आवाडे यांनी आपला अर्जच न भरल्याने सत्ताधाऱ्यांसमोर पेच निर्माण झाला होता. दहा सदस्यांची नावे चंद्रकांतदादा पाटील आणि अन्य नेत्यांशी चर्चा करून निश्चित केली जातील, असेही या निवडीदिवशी स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर काही नावे निश्चित करण्यात आली. मात्र, तरीही बांधकाम समितीतील १, वित्त समितीतील १ आणि बांधकाम समितीतील २ अशा एकूण चार जागा आजही रिक्त आहेत. कोणत्याही परिस्थितीत राहुल आवाडे यांना ‘स्थायी’ समितीमध्ये संधी हवी होती. मात्र, ‘स्थायी’च्या सर्व सदस्यांंची निवड जाहीर झाली होती. त्यातून अखेर मार्ग काढण्याची जबाबदारी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यावर सोपविण्यात आली. हाळवणकर यांनीच अखेर त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडून आलेल्या विजया पाटील यांना राजीनामा देण्याची विनंती केली. त्यानुसार गेल्या महिन्यात झालेल्या ‘स्थायी’च्या पहिल्याच बैठकीतच विजया पाटील यांनी आपल्या ‘स्थायी’ समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्याकडे दिला. विजया पाटील यांना बांधकाम समितीवर संधी देण्याचे निश्चित करण्यात आले असून त्यानंतरच पाटील यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. आता या ठिकाणी राहुल आवाडे यांना संधी देण्यात येणार आहे तरीही पशुसंवर्धन आणि वित्त समितीच्या एकूण ३ जागा रिक्त आहेत. या तीनही जागांवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सदस्यांना संधी देण्यात येणार असून त्याबाबतची जबाबदारी राष्ट्रवादीचे युवराज पाटील व काँग्रेसचे उमेश आपटे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. भाजपकडून या सर्व प्रक्रियेची जबाबदारी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली गटनेते अरुण इंगवले यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नावे मंजूर झाल्यानंतरच डायऱ्यांचे वाटपजूनच्या अखेरीस जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा घेण्याचे नियोजन आहे. त्याआधीच होणाऱ्या ‘स्थायी’मध्ये या सदस्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करून त्यानंतर जिल्हा परिषदेच्या डायऱ्यांची अंतिम छपाई करण्यात येणार आहे. या डायऱ्या सर्वसाधारण सभेत सदस्यांना वितरित करण्यात येणार असून, त्याआधी या सदस्यांच्या समिती वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. येणाऱ्या ‘स्थायी’मध्ये शिक्कामोर्तबया नव्या बदलावर येणाऱ्या ‘स्थायी’ समितीच्या सभेत शिक्कामोर्तब होणार आहे. राहुल आवाडे, विजया पाटील यांची स्थायी व बांधकाम समितीवरील तसेच उर्वरित ३ समिती सदस्यांची नियुक्ती या स्थायी समितीमध्ये मंजूर केली जाईल.