शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

घटना बदलून शासनाला मनुस्मृती आणायची आहे?

By admin | Updated: March 3, 2015 00:33 IST

बी. जी. कोळसे-पाटील : बुद्धिप्रामाण्यवाद स्वीकारणे अपरिहार्य

सांगली : धर्मांतरबंदीचा कायदा आणण्याची भाषा करणाऱ्या केंद्र सरकारची सध्याची धोरणे पाहता त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना बदलून मनुस्मृती आणायची आहे का? असा प्रश्न माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत उपस्थित केला. लोकशासन आंदोलनाच्या निमित्ताने ते सांगलीत आले असता पत्रकारांशी बोलत होते. यावेळी कोळसे-पाटील म्हणाले की, कॉँग्रेसने धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली कोणतीच ठाम भूमिका घेतली नाही. त्यांनी सगळ्यांनाच गोंजारण्याचे काम केले. त्यामुळेच आताचे पात्रनसलेले सरकार देशाला मिळाले आहे. पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी यांना निवडणुकीस कोणी उभे केले, हेच कॉँग्रेसला समजले नाही. भांडवलदारांच्या खांद्यावरच मोदी उभे आहेत व त्यांच्या सोयीचेच निर्णय घेत आहेत. त्याचा प्रत्यय अर्थसंकल्पातून आला आहे. सध्या काही महिन्यांपासून महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण सुरू आहे. घटनेने प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्य दिले आहे, असे असतानाही धर्मांतरबंदी कायदा आणण्याची शासनाची इच्छा आहे. म्हणजे शासनाला घटनेत बदल करून मनुस्मृती आणण्यात स्वारस्य आहे, असेच वाटते. शब्दप्रामाण्यवादात अडकून न पडता आपण बुद्धिप्रामाण्यवादाचा स्वीकार करणे अपेक्षित आहे. तसा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांची हत्या केली जाते. हल्लेखोर अद्यापही मोकाट आहेत. कदाचित भविष्यात हल्लेखोरांना अटक करण्यात येईल; परंतु यामागे ज्यांचा मेंदू आहे त्यांना पकडणे आवश्यक आहे; परंतु तो मेंदू असणाऱ्यांच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची, हाच खरा प्रश्न आहे. विचारांचा सामना विचारांनीच केला पाहिजे, हे देखील आपल्या लक्षात येत नाही. मूलभूत समस्या सोडविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असताना कोणताही राजकीय पक्ष तशा पद्धतीचे प्रयत्न करीत नसल्याचेही कोळसे-पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)दारिद्र्यरेषेच्या याद्या प्रसिद्ध करण्यासाठी होणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी आम्हाला इतर ठिकाणांहून येथे यावे लागते. हे कशाचे लक्षण आहे? सांगली जिल्ह्यात कोणी सामान्यांच्या प्रश्नांवर होणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्व करणार का निर्माण होत नाही? तुमच्या जिल्ह्याची संस्कृती काय? याची तरी जाण ठेवा, असे आवाहनही कोळसे-पाटील यांनी केले.