शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

मनपातील सत्तेत बदल अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:52 IST

कोल्हापूर : केवळ चार नगरसेवक असलेल्या शिवसेनेने मनपात सत्तारूढ कॉँग्रेस-राष्टÑवादीला पाठिंबा दिला असून, गेल्या तीन वर्षांत त्याच्या मोबदल्यात परिवहन ...

कोल्हापूर : केवळ चार नगरसेवक असलेल्या शिवसेनेने मनपात सत्तारूढ कॉँग्रेस-राष्टÑवादीला पाठिंबा दिला असून, गेल्या तीन वर्षांत त्याच्या मोबदल्यात परिवहन समिती सभापतिपद पदरात पाडून घेतले आहे. त्यामुळे आता शिवसेना-भाजप युती झाली असली, तरी मनपात निर्माण झालेले संबंध लगेच संपुष्टात येतील, असे दिसत नाही. शिवाय शिवसेनेने जरी सत्तारूढ गटाची साथ सोडली, तरी संख्याबळ पाहता लगेच सत्तांतर होणेही अशक्य आहे.महानगरपालिकेत शिवसेनेचे केवळ चार, तर भाजपचे १४ नगरसेवक आहेत. तरीही सत्ताकारणात शिवसेनेने भाजपला वगळून कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीला पाठिंबा दिला; त्यामुळे भाजपला येथे आपला महापौर करणे अशक्य झाले. नुकत्याच झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने अनेक मार्गाने शिवसेनेचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सेनेने त्यास दाद दिली नाही. त्यामुळे भाजपच्या जयश्री जाधव यांना महापौर होण्याची संधी गमवावी लागली. राज्यात सोमवारी शिवसेना-भाजप यांच्यात युती झाली; त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेतही काही बदल घडणे अपेक्षित आहे; मात्र राज्यात एकीकडे युती होत असताना मनपात मात्र शिवसेनेचे अभिजित चव्हाण कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर परिवहन समितीचे सभापती झाले. त्यामुळे येथे त्यांचे सूत चांगले जमले आहे. भाजपला सत्ता काबीज करायची झाली, तर कॉँग्रेस-राष्टÑवादीचे किमान चार नगरसेवक फोडावे लागतील; त्यासाठी पाच-सहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागेल.