शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

मोदामृत उपचार पद्धती एक लाख मुलांपर्यंत पोहोचवू  : चंद्रकांत पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 14:42 IST

भारतीय आयुर्वेद ही उपचाराची सर्वोेत्तम पद्धती आहे.भावी पिढी सुदृढ असणे ही काळाची गरज आहे त्यामुळे विश्ववती आयुर्वेद चिकित्सालयमध्ये तयार करण्यात आलेली मोदामृत ही कुपोषणावरील उपचार पद्धती एक लाख मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली.

ठळक मुद्देमोदामृत उपचार पद्धती एक लाख मुलांपर्यंत पोहोचवू  : चंद्रकांत पाटील  विश्ववती आयुर्वेद चिकित्सालयाचे उदघाटन

कोल्हापूर : भारतीय आयुर्वेद ही उपचाराची सर्वोेत्तम पद्धती आहे.भावी पिढी सुदृढ असणे ही काळाची गरज आहे त्यामुळे विश्ववती आयुर्वेद चिकित्सालयमध्ये तयार करण्यात आलेली मोदामृत ही कुपोषणावरील उपचार पद्धती एक लाख मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली.विश्वपंढरी येथे विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय व संशोधन केंद्राच्या उदघाटन प्रसंगी ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे होते. यावेळी आमदार सतेज पाटील, सुजित मिणचेकर, आनंदनाथ महाराज, रामराया सांगवडेकर, वैद्य समीर जमदग्नी, कैलास काटकर उपस्थित होते.

विश्वपंढरी येथे बुधवारी विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय व संशोधन केंद्राचे उदघाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कैलास काटकर, आमदार सतेज पाटील, आनंदनाथ महाराज, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माणिक पाटील चुयेकर, आमदार सुजित मिणचेकर आदी उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)मंत्री पाटील म्हणाले, लोक राजकारण्यांपेक्षा महाराजांचे म्हणणे ऐकतात त्यामुळे आयुर्वेदाचा उपयोग गरीब रुग्णांसाठी करणारे मठ आणि संस्थांना मजबूत केले पाहीजे. बालपणातच मुलांचे व्यवस्थित पोषण होणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्राने संशोधनातून तयार केलेल्या मोदामृतचा प्रयोग आपण शहरातील २५ झोपडपट्टयांमधील ५०० मुलांवर करू. त्याचा चांगला परिणाम दिसला तर जूननंतर १ लाख मुलांपर्यंत ते पोहोचवले जाईल.आमदार सतेज पाटील म्हणाले,आजाराचे योग्य निदान आणि उपचार ही माणसाची गरज आहे. जिथे सगळे उपचार संपतात तिथे आयुर्वेदाचा दरवाजा उघडतो. महाराष्ट्रातील नंदुरबार सारख्या कुपोषणग्रस्त भागांमधील मुलांना मोदामृतसारखी उपचार पद्धती देता येईल का याचा विचार व्हावा. आमदार सुजित मिणचेकर यांनीही आयुर्वेद चिकित्सापद्धतीचा शासनाने प्रचार व प्रसार करावा असे आवाहन केले.यावेळी आनंदनाथ महाराज, वैद्य समीर जमदग्नी, कैलास काटकर यांनी मनोगत व्यक्त केले. राहूल शेलार यांनी प्रास्ताविक केले. प्रसाद पानकर यांनी केंद्रात होत असलेल्या संशोधनाची माहिती दिली. परेश देशमुख यांनी सुत्रसंचलन केले.

राजकारणात ठरवून अपघातयावेळी आमदार सतेज पाटील यांनी आम्हा राजकारणी मंडळींना अनेक ताणतणाव आणि धकाधकीला सामोरे जावे लागते त्यामुळे आमच्यासाठी काही उपचार पद्धती सांगा असे सांगितले, हा धागा पकडत मंत्री पाटील म्हणाले, राजकारणात ठरवून अपघात केले जातात. राजकीय मंडळींना सकारात्मक विचारांचे इंजेक्शन द्या. आचारसंहितेच्या ४५ दिवसात एकमेकांवर वाट्टेल ते आरोप कररूया, पण निवडणूक संपली की सगळं विसरून एकमेकांना मदत केले पाहीजे असे इंजेक्शन आणि सॉफ्टवेअर तयार करा. त्यांच्या या वाक्यावर एकच हशा पिकला.

 

टॅग्स :ministerमंत्रीkolhapurकोल्हापूरMedicalवैद्यकीय