शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

चंद्रकांतदादांनी गायले कोळीगीत

By admin | Updated: May 10, 2017 00:35 IST

बालकलाकारांनी धरला ताल : नाट्य व चित्रपट अभिनय शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्याचे महसूलमंत्रिपद सांभाळणाऱ्या चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वातील वेगळ्याच पैलूचे दर्शन मंगळवारी येथे घडविले. येथे सुरू असलेल्या अभिनय शिबिराला अचानक भेट देऊन दादांनी चक्क तेथे ‘टिमक्याची चोली बाय, रंगान फुलायली... तुझी माझी जमली जोरी माझे वेसावकरीण बाय गो’ हे गाणे गायला सुरुवात केली आणि उपस्थित बालचमूने त्यांच्या गाण्यावर ताल धरला. एवढेच नव्हे तर दादांच्या या गाण्याला ‘वन्समोअर’चा आग्रहही झाला! येथील कोल्हापूर थिएटर संस्थेच्या नाट्य व चित्रपट अभिनय शिबिराला ३ मेपासून सुरुवात झाली होती. या शिबिराचे उद्घाटनही चंद्रकांतदादा यांच्या हस्ते झाले होते. मंगळवारी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेल्या दादांना हे शिबिर सुरू होते, त्या परिसरातून जाताना त्याची आठवण झाली आणि त्यांनी गाडी या शिबिराकडे घ्यायला सांगितली. कोणतीही पूर्वकल्पना न देता दादांनी एंट्री केल्याने संयोजकही गडबडले. परंतु, कोणताही बडेजाव न बाळगता दादांनी बालकलाकारांशी संवाद साधायला सुरुवात केली. त्यांच्याशी गप्पा मारल्या. मीही शिबिरांमध्ये जात होतो, असे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिबिरे, त्यांतील बौद्धिके, देशभक्तिपर गीते, खेळ यांची माहिती देताना दादा जुन्या आठवणींमध्ये रमून गेले. यावेळी या मुलांनी सादर केलेल्या मुक्त अभिनयाला त्यांनी रोख बक्षीसही दिले. या गप्पा संपतानाच त्यांनी माईक हातात घेतला आणि थेट कोळीगीतच म्हणायला सुरुवात केली. यावेळी शिल्पा माजगावकर, विजय टिपुगडे, अभिनेते संजय मोहिते, अ‍ॅड. दिलशाद मुजावर, संजय मुंगळे, राजश्री खटावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ...अन् बालचमूंचे पाय थिरकलेदादांचे कोळीगीत सुरू झाल्यानंतर उपस्थित सर्वांनीच टाळ्यांचा ठेका धरला आणि बालचमूंचे पाय थिरकायला लागले. संपूर्ण कडवे म्हणून झाल्यानंतर दादा थांबले तेव्हा बालकलाकारांनी ‘वन्समोअर’ची मागणी केली. यानंतर सर्व मुलांसमवेत त्यांनी फोटो काढले आणि एका अनोख्या अनुभवाची शिदोरी घेऊन बालकलाकार घरी परतले. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी अभिनयाच्या शिबिरामध्ये गाणे गायला सुरुवात केली आणि बालचमूने त्यांच्या गीतावर ठेका धरला.