शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

दिवसा स्वप्ने पाहणारे चंद्रकांतदादा सत्तेच्या नशेत

By admin | Updated: October 31, 2015 00:32 IST

राजेश क्षीरसागर यांचा प्रतिटोला : माझी आमदारकी जनतेच्या जिवावरच

कोल्हापूर : मला घरी बसवायचे दिवसा स्वप्न पाहणारे ‘दादा’ सत्तेच्या नशेत आहेत, असा प्रतिटोला आमदार राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी पत्रकाद्वारे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना हाणला. माझी आमदारकी जनतेच्या जिवावरच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.गुरुवारी क्रशर चौक येथे झालेल्या सभेत पालकमंत्री पाटील यांनी ‘क्षीरसागर यांची ही शेवटचीच आमदारकी’ असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर शुक्रवारी आमदार क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.मला कोणी घरी बसविणार, या धमक्यांना मी घाबरत नाही, असा पलटवार करीत, शिवसेनेशी वाकडं घ्याल तर ‘दादा,’ तुमचा पुढच्या निवडणुकीत ‘नाना’ होईल, हे ध्यानात ठेवा, असा खरमरीत इशारा देत, आमदार क्षीरसागर यांनी लॉटरी लागलेल्या या महोदयांची अवस्था म्हणजे टी.व्ही. मालिकेतील ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ अशीच आहे. ‘आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे’ या म्हणीप्रमाणे रांगत निवडून आलेल्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. ते सध्या त्यांच्याच स्वप्नात वावरत असून जिल्ह्याचे दादा म्हणवून घेण्यासाठी त्यांनी गुंड, मटकेवाले अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या सात पिढ्या गेल्या, तरी शिवसेनेला ते कधीही संपवू शकत नाहीत, असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला.क्षीरसागर म्हणाले, क्षीरसागर यांना घरी बसविणार म्हणणाऱ्या पालकमंत्र्यांच्या मुठीत जणू काही शहरातील तीन लाख मतदार असून, ते स्वत: तीन लाख वेळा बटन दाबून आपल्याला पराभूत करणार आहेत, असेच त्यांना वाटते. पालकमंत्र्यांनी गेल्या दोन्ही विधानसभा आणि त्यांच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचा अभ्यास करावा. पहिल्या निवडणुकीत पालकमंत्री ६००० च्या मताधिक्याने निवडून आले होते. तर मी विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीत ३७०० मताधिक्याने निवडून आलो होतो. उलट दुसऱ्या निवडणुकीत ‘दादां’चे मताधिक्य घटून ३००० वर आले, तर आपले मताधिक्य वाढून २३ हजार ५०० वर गेले. पुढील निवडणुकीत ते ५० हजारांवर जाईल. त्यामुळे शिवसेनेशी वाकडे घ्याल, तर पुढच्या निवडणुकीत ‘दादा’ तुमचा ‘नाना’ होईल, हे ध्यानात ठेवावे. माझी आमदारकी जनतेने ठरविलेली आहे. त्यामुळे अशा घरी बसविण्याच्या धमक्यांना आपण भीक घालत नाही. (प्रतिनिधी)लाट ओसरल्यावर दादांना आमदारकी टिकविणे अवघडआमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, दादांनी स्वत:च्या कारकिर्दीचा अभ्यास करावा आणि कोणत्या ठिकाणी ठोस विकासकाम केले, याचा खुलासा करावा. मोदींची लाट ओसरली की दादांना त्यांची आमदारकीही टिकविणे मुश्कील होऊन बसेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही आम्हाला वंदनीय आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका करताना जिभेला आवर घालावा. अन्यथा, शिवसैनिकांची सटकली, तर दादांसह त्यांच्यासोबत असणाऱ्या ‘बेडकां’च्या पायांखालची वाळू घसरायला वेळ लागणार नाही.