शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांतदादा, खाडेंवरील खटला मागे

By admin | Updated: July 5, 2017 00:17 IST

चंद्रकांतदादा, खाडेंवरील खटला मागे

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : मिरज दंगलप्रकरणी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आ. सुरेश खाडे, भाजपचे प्रदेश सचिव मकरंद देशपांडे, माजी जिल्हाध्यक्ष रमेश भाकरे, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, हणमंत पवार, शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग पाटील यांच्यासह ५१ जणांविरुद्ध न्यायालयात दाखल करण्यात आलेला खटला शासनाने मागे घेतला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मिरज न्यायालयात गृह विभागाचा खटला मागे घेण्यात आल्याचे पत्र सादर करून, या निर्णयाबद्दल पेढे वाटून आनंद व्यक्त केला.मिरजेत २००९ मध्ये गणेशोत्सवात पोस्टरच्या वादातून झालेल्या दोन गटांतील दंगलीप्रसंगी जमावाने ब्राह्मणपुरीतील गजानन मंगल कार्यालयापासून पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढला होता. पोलिसांनी श्रीकांत चौकात जमावाला रोखल्यानंतर, जमावाने पोलिसांवर दगडफेक करून रस्त्यावर टायर पेटविल्या होत्या. पोलीस वाहनासह (एमएच-१०-एन ७०५) श्रीकांत चौकातील हॉटेल्स व दुकानांवर दगडफेक करून ५० ते ६० हजारांचे नुकसान व पोलीस कर्मचाऱ्यांना जखमी केल्याप्रकरणी पोलिसांनी तत्कालीन आमदार चंद्रकांतदादा पाटील, आ. सुरेश खाडे, मकरंद देशपांडे, हणमंत पवार, ओंकार शुक्ल, पांडुरंग कोरे, अरविंद लोहार, तानाजी घारगे, गणेश पलसे, अभय सहस्रबुध्दे, अरविंद देशपांडे, महेश सहस्रबुध्दे, सौ. प्राची पाठक, दिलीप पाटील, संगीता पाटील, कुसूम पवार यांच्यासह सुमारे ५१ भाजप, शिवसेना कार्यकर्त्यांवर मिरज न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याच्या सुनावणीप्रसंगी संशयितांचे वकील वासुदेव ठाणेदार यांनी, शासनाने हा खटला मागे घेतल्याचे पत्र मंगळवारी हजर केल्यानंतर न्यायालयाने सुनावणी रद्द केली. अन्य खटल्यांचा अद्याप निर्णय नाही मिरज दंगलप्रकरणी पोलिसांनी ३७ गुन्हे दाखल करून दोन्ही गटांच्या सुमारे ६०० जणांना अटक केली होती. दंगलप्रकरणी सर्व संशयितांविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. दंगलीत निरपराध तरुणांवर दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याची मागणी आ. सुरेश खाडे यांनी शासनाकडे केली होती. मात्र, आ. खाडे, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे संशयित असलेला दंगलीचा एकच खटला शासनाने मागे घेतला आहे. दंगलप्रकरणी पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केलेल्या अन्य खटल्यांची सुनावणी रखडल्याने त्यांचा अद्याप निर्णय झालेला नाही.