कोपार्डे : सहकारात नरके घराण्याची तिसरी पिढी काम करीत आहे. गोकुळ, कुंभी-कासारी साखर कारखाना व सहकारी बँकांबरोबर शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून नरके घराण्याने करवीर, पन्हाळा, बावडा तालुक्यांतील जनतेचे जीवनमान उंचावले आहे. सहकारातील याच शिदोरीवर करवीर मतदारसंघातील जनता विरोधकांचा केवळ पट काढणार नाही, तर चितपट करणार असल्याचे आमदार चंद्रदीप नरके यांनी जाहीर केले.कोल्हापूर येथील दुधाळी मैदानावर करवीर मतदारसंघामधून (क्र. २७५) विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झालेल्या सभेवेळी आमदार नरके बोलत होते.छुपे विरोधक गेल्याने विजय निश्चितपी. एन. पाटील : जोरदार शक्तिप्रदर्शनाने दाखल केला उमेदवारी अजकोल्हापूर : गेल्या वेळेला माझ्याविरोधात छुपी लढाई करणारे बाजूला गेले आहेत. आमदार महादेवराव महाडिक माझ्याबरोबर असल्याने व आता आतून आणि बाहेरून काही राहिले नसल्याने विजय निश्चित असल्याचा विश्वास कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी व्यक्त केला. जोरदार शक्तिप्रदर्शन करीत गांधी मैदान येथून रॅलीने जाऊन पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पाटील म्हणाले, अर्ज दाखल करण्यासाठी आलेली गर्दी पाहिली, तर ही निवडणूक तरुणांनी हातात घेतलेली आहे. पंधरा वर्षे ज्यांच्याबरोबर मित्रत्वाच्या नात्याने प्रामाणिक राहिलो, ते सोडून गेले आहेत. बरे झाले, आता आतून फसविले म्हणायचे कारणच नाही.र्
पट नाही, चितपटच करणार- चंद्रदीप नरके :
By admin | Updated: September 26, 2014 23:28 IST