शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

चंदीगढ, एनसीआर दिल्ली अजिंक्य

By admin | Updated: January 29, 2015 00:17 IST

राष्ट्रीय शूटिंगबॉल स्पर्धा : महाराष्ट्र, हरियाणा उपविजेते

जयसिंगपूर : जयसिंगपूर स्पोर्टस् अकॅडमी व श्रीमती राजमती गतारे चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित राष्ट्रीय पातळीवरील शूटिंगबॉल स्पर्धेत पुरुष गटात चंदीगढ संघाने ओम नमो चषक पटकाविला. तर महिला गटात एनसीआर दिल्ली संघाने राजमती चषक पटकाविला. विजेत्या संघांना उद्योगपती राजेंद्र मालू यांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले. येथील आयोध्या मालू क्रीडानगरीत या स्पर्धा पार पडल्या. पुरुष गटातील उपांत्य फेरीत चंदीगढ विरुद्ध पंजाब, उत्तरप्रदेश विरुद्ध महाराष्ट्र यांच्यात सामने झाले. यावेळी चंदीगढने पंजाबवर १५-६, १५-१० अशा, तर महाराष्ट्र संघाने १५-११, १५-१३ अशा गुणफरकाने उत्तरप्रदेशवर मात केली.अंतिम सामना महाराष्ट्र व चंदीगढ यांच्यात अत्यंत अटीतटीचा झाला. पहिला सेट १५-११ अशा गुणफरकाने महाराष्ट्र संघाने जिंकला, तर दुसरा व तिसरा असे सलग दोन सेट चंदीगढ संघाने १५-४ व १५-२ अशा गुणफरकाने मात करीत ओम नमो चषक पटकाविला. मालिकावीर म्हणून चंदीगढ संघाचा सुरेंद्रकुमार बिष्णाई, सामनावीर किताब महाराष्ट्र संघाच्या जयंत खंडागळे, बेस्ट शुटर नवयुवक नांद्रे संघाच्या दीपक खाडे, बेस्ट स्कूपर महाराष्ट्र संघाचा सुशांत पवार, बेस्ट नेटमनचा किमाब चंदीगढ संघाचा सुखदीप याने पटकाविला. स्पर्धेत अरुणकुमार, निट्टू, खाशाबा जाधव, खली यांची खेळी उत्कृष्ठ ठरली.महिला गटात उपांत्य फेरीत एनसीआर दिल्ली संघाने सांगलीवर मात केली तर हरियाना संघाने कर्नाटक संघावर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात एनसीआर दिल्ली संघाने हरियाना संघावर १३-१५, १५-१२, १५-१० अशा गुणफरकाने मात करीत राजमती चषक पटकाविला. महिला गटात मालिकावीर महिला निलीमा कोष्टी, सांगली हिने तर सामानावीर महिला सुखदा हरियाणा, बेस्ट शुटर किताब पूजा एनसीआर दिल्ली यांनी पटकाविला.बक्षीस वितरणप्रसंगी शितल गतारे, सर्जेराव पवार, शैलेश आडके, राजेंद्र आडके, शेखर हेरेकर, पिंटू कुलकर्णी, अजित पवार, डॉ. अतिक पटेल, शिवाजी सावंत, आर. वाय. पाटील यांच्यासह जयसिंगपूर स्पोर्टस् अकॅडमी व क्रीडा रसिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)