तालुक्याचे ठिकाण असल्याने येथील संभाजी चौकात नेहमीच वर्दळ असते. मात्र, बसथांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. अनेक वर्षे मागणी करूनही प्रवाशांसाठी बसथांबा होत नव्हता. आमदार पाटील यांच्या सहकार्याने पं. स. सदस्य दयानंद काणेकर यांच्या पुढाकाराने संभाजी चौकात नव्याने बसथांबा उभारण्यात आला आहे. या वेळी मुख्याधिकारी अभिजित जगताप, नगरसेवक, राजेंद्र परीट, अल्लीसो मुल्ला, अशोक दाणी, शकील नेसरीकर, प्रमोद कांबळे, अरुण पिळणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फोटेा ओळी : चंदगड येथील संभाजी चाैकात उभारण्यात आलेल्या बसथांब्याचे उद्घाटन आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी नगराध्यक्षा प्राची काणेकर, दयानंद काणेकर आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०३०९२०२१-गड-०४