राम मगदूम। गडहिंग्लज
: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोविड-१९ च्या संसर्गाचे प्रमाण गडहिंग्लज व चंदगड तालुक्यात दिवसागणिक वाढते आहे. तरीदेखील कोरोनाला हरविण्यात चंदगड नगरपंचायत व गडहिंग्लज नगरपंचायत आघाडीवर आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चंदगडला ७७.५०, तर गडहिंग्लजला ६८.१३ टक्के इतके आहे.
१ एप्रिल ते २१ मेअखेर गडहिंग्लज तालुक्यातील ग्रामीण भागातील ५२७३ नागरिकांच्या तपासण्या झाल्या. त्यामध्ये १३७८ बाधित आढळून आले. त्यापैकी ७६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर ५८ रुग्णांचा मृत्यू झाला.
गडहिंग्लज शहरातील २५९९ नागरिकांच्या तपासण्या केल्या. त्यामध्ये ४५५ बाधित आढळून आले. त्यापैकी ३१० रुग्ण बरे झाले असून १६ रुग्णांचा मृत्यू झाला.
चंदगड तालुक्यातील ग्रामीण भागातील ३४७९ नागरिकांच्या तपासण्या केल्या, त्यात ७५५ बाधित आढळून आले. त्यापैकी ४९५ रुग्ण बरे होऊन, २२ रुग्णांचा मृत्यू झाला.
चंदगड शहरातील ८७५ नागरिकांच्या तपासण्या केल्या. त्यात १६० बाधित आढळून आले. त्यापैकी १२४ रुग्ण बरे झाले, तर २ रुग्णांचा मृत्यू झाला.
गडहिंग्लज तालुक्यातील एकूण ७८७२ नागरिकांच्या तपासण्या केल्या. त्यात १८३३ बाधित आढळून आले. त्यापैकी १०७९ रुग्ण बरे झाले, तर ७४ रुग्णांचा मृत्यू झाला.
चंदगड तालुक्यातील एकूण १२२२६ नागरिकांच्या तपासण्या केल्या. त्यात २७४८ बाधित आढळून आले. त्यापैकी १६९८ रुग्ण बरे झाले, तर ९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा प्रशासनाच्या कडक लॉकडाऊनमुळे दोन्ही तालुक्यातील बाधितांचे प्रमाण कमी आले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढते आहे. तपासण्या वाढवून कोरोनाची लक्षणे असणाऱ्या सर्व रुग्णांना संस्थात्मक अलगीकरणात आणि गंभीर रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्याची धडक मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्यास मदत होत आहे.
-------------------------------
२१ मे २०२१ अखेर
* गडहिंग्लज शहराची आकडेवारी अशी :
- एकूण तपासण्या : २५९९, बाधित - ४५५, बरे झाले ३१०, मृत्यू - १६ (मृत्यूदर : ३.५)
* चंदगड शहराची आकडेवारी अशी :
- एकूण तपासण्या : ८७५, बाधित - १६०, बरे झाले १२४, मृत्यू - २ (मृत्यूदर : १.३)
-------------------------------