शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

राष्ट्रवादीला महाआघाडीचे आव्हान

By admin | Updated: November 10, 2016 00:17 IST

कागल नगरपालिका : मुश्रीफांना एकाकी झुंझावे लागणार; मंडलिक-घाटगे एकत्र

जहाँगीर शेख - कागल -कागल नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अखेर भाजप-शिवसेना मित्रपक्षांची मिळून महाआघाडीची घोषणा झाली असून, यामुळे कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससमोर तगडे आव्हान निर्माण झाले आहे. प्रा. संजय मंडलिक, समरजितसिंह घाटगे, संजय घाटगे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीशी आमदार हसन मुश्रीफ यांना एकाकी झुंझावे लागणार आहे.नगरपालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासून कागलमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ‘कमळ’ चिन्हावरचा असेल, असे प्रयत्न पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सुरू केले होते. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसला रोखायचे असेल तर मुश्रीफांना त्यांच्या कागलमध्ये पहिल्यांदा घेरावे लागेल, हे ओळखून त्यांनी नियोजन केले. समरजितसिंह घाटगेंच्या भाजप प्रवेशानंतर कागलमध्ये महाआघाडी होणार, याची जोरदार चर्चा झाली. आमदार मुश्रीफ यांनीही कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन माझ्या विरोधात राजकीय षङ्यंत्र रचले जात असून, माझा अभिमन्यू केला जात आहे, असे कार्यकर्त्यांना सांगितले. यातून एकाकी लढण्याची तयारी करून घेतली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरताना मात्र ‘आघाडी की महाआघाडी’ असा नवा प्रश्न समोर आला. महाआघाडीच्या जागावाटपात बोलणी फिस्कटू लागली. कागलमध्ये समरजितसिंह घाटगेंनी, तर मुरगूडमध्ये प्रा. संजय मंडलिकांनी टोकाची भूमिका घेतली. या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी कागलच्या राजकीय घडामोडीची अचानक दिशा बदलली. अनपेक्षितपणे मुश्रीफ-मंडलिक गटात बोलणी सुरू होऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात जागावाटप निश्चित झाले. १५ जागा राष्ट्रवादीला आणि ५ जागा शिवसेनेला असे ठरल्याचे आणि मंडलिक गटाचे प्रमुख कार्यकर्ते बाबगोंड पाटील आणि चंद्रकांत गवळी यांच्या सहीने जागा वाटपाचा करार प्रसिद्ध झाल्याने जिल्हाभर खळबळ उडाली.या महाआघाडीचे पडसाद राज्यपातळीवर उमटले. अखेर प्रा. संजय मंडलिकांना घेऊन प्रवीणसिंहराजे घाटगे आणि समरजितसिंह घाटगे रात्री नऊ वाजता कागल शहरात आले आणि मुश्रीफ गटाशी कोणतीही आघाडी आम्ही केलेली नाही, हे जाहीर केले. असे असले तरी बाबगोंड पाटील, चंद्रकांत गवळी हे मंडलिक साखर कारखान्याचे संचालक मुश्रीफांशी केलेल्या आघाडीवर ठाम होते. अशा वातावरणात हा आठवडा आघाडी की महाआघाडी या चर्चेत गेला. शेवटी मंगळवारी मुश्रीफ यांच्या विरोधात महाआघाडीची घोषणा झाली आहे. यामुळे दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांचा लढाईचा मार्ग मोकळा झाला आहे. कागल शहरात आता रंगतदार राजकीय लढाई दिसणार आहे.शिवसेनेचा उमेदवार कोण?महाआघाडीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार १८ जागा भाजप, तर एक जागा शिवसेना आणि एक शेतकरी संघटनेला, असे ठरले आहे. सागर कोंडेकर यांनी उमेदवारी जाहीर केली आहेच. आता एका जागेवर शिवसेनेचा कोणता उमेदवार असेल, याची उत्सुकता आहे. चंद्रकांत गवळींच्या भूमिकेकडे लक्ष मुश्रीफ गटाशी आघाडीचा निर्णय घेणारे मंडलिक साखर कारखान्याचे संचालक बाबगोंड पाटील आणि चंद्रकांत गवळी यांच्या भूमिका गुलदस्त्यात होत्या. मात्र, मंगळवारी महाआघाडीच्या जागा वाटपावर सही करून बाबगोंड पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आता कागलमध्ये श्रीनाथ सहकार समूह उभारणारे चंद्रकांत गवळी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष वेधले आहे.