शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

आरक्षणे कुणी उठविली याची चौकशी कराच... मनपा पदाधिकाऱ्यांचे पालकमंत्र्यांना आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 01:17 IST

कोल्हापूर : ‘महापालिकेत सन २०१० पासून पक्षीय राजकारणाच्या माध्यमातून शहराचा विकास करताना काँग्रेस आघाडीच्या दोन्ही नेत्यांनी जाहीरनाम्यामध्ये जनतेला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे एकही आरक्षण उठविलेले नाही. तथापि पालकमंत्र्यांनी गेल्या २० वर्र्षांतील आरक्षण उठविण्याच्या कारभाराची चौकशी करण्याचे जाहीर केले आहे. ती चौकशी त्यांनी एकदा करावीच; म्हणजे त्यांच्या अवतीभवती असणाच्या माणसांचे कर्तृत्व त्यांच्या व ...

ठळक मुद्दे ..तर बांधकाम पाडण्याचे आदेश द्या

कोल्हापूर : ‘महापालिकेत सन २०१० पासून पक्षीय राजकारणाच्या माध्यमातून शहराचा विकास करताना काँग्रेस आघाडीच्या दोन्ही नेत्यांनी जाहीरनाम्यामध्ये जनतेला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे एकही आरक्षण उठविलेले नाही. तथापि पालकमंत्र्यांनी गेल्या २० वर्र्षांतील आरक्षण उठविण्याच्या कारभाराची चौकशी करण्याचे जाहीर केले आहे. ती चौकशी त्यांनी एकदा करावीच; म्हणजे त्यांच्या अवतीभवती असणाच्या माणसांचे कर्तृत्व त्यांच्या व कोल्हापूरच्या जनतेसमोर येईल.’, असे आव्हान महानगरपालिकेतील पदाधिकाºयांनी शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्रकाद्वारे दिले. तावडे हॉटेल परिसरातील अवैध बांधकामाशी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुमचा खरेच संबंध नसेल तर उच्च न्यायालयाच्या निवड्याप्रमाणे संबंधित बांधकामांवर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांना तातडीने द्यावेत, असे आवाहनही या पदाधिकाºयांनी केले आहे.पालकमंत्री पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केलेल्या टीकेला या पत्रकात प्रत्युतर देण्यात आले आहे. त्यासंबंधीचे पत्रक महापौर स्वाती यवलुजे, उपमहापौर सुनील पाटील, सभागृह नेता दिलीप पोवार, गटनेता शारंगधर देशमुख, राष्टÑवादीचे नेते आर.के.पोवार, शहराध्यक्ष राजेश लाटकर, आदींनी प्रसिध्दीस दिले आहे.मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत प्रशासनातील अधिकाºयांना बोलावून कारवाई थांबविण्यासंदर्भात तोंडी आदेश दिले व त्यासंदर्भातील बातम्या प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झाल्यानंतर आम्ही आपणांस काही प्रश्न विचारले व महापालिकेच्या स्वायत्ततेच्या दृष्टीने काही शंका उपस्थित केल्या, तर त्याचा आपल्याला एवढा राग येण्याचे कारण काय? याचे समर्पक उत्तर न देता मूळ मुद्द्याला बगल देऊन जनतेचे लक्ष इतरत्र वळवण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही ज्या दादांना सुसंस्कृत समजत होतो, ते दादा हेच काय? असा प्रश्न आम्हांलाही पडला आहे असेही पत्रकात म्हटले आहे.दगड तुमच्यावरच पडतील..आमचे नेते गेली २५-३० वर्षे अखंडपणे सकाळी सहा वाजल्यापासून सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत असतात. त्यांच्या घराला सर्वसामान्य जनतेच्या पाठबळाचे व आत्मीयतेचे बुलेटपु्रफ कवच आहे. त्यामुळे आपण कितीही दबंगगिरीचे दगड मारले तरी ते दगड उलटे फिरून तुमच्यावरच येणार आहेत, हे ध्यानात ठेवावे. आमदारकी ही मागून मिळत नाही. त्यासाठी लोकांचे प्रेम व जिव्हाळा असावा लागतो, असे पत्रकात म्हटले आहे.महापौरांच्या अवमानाबद्दल निषेधपालकमंत्र्यांनी महापौरांना ‘चिल्लीपिल्ली’ म्हणून त्यांचा अवमान करणे हा जनतेचा अवमान आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण पालकमंत्र्यांचा निषेध करीत आहोत. एक महिला महापौर असताना त्यांच्याबद्दल केलेले वक्तव्य निश्चितच निंदनीय आहे, असे पदाधिकाºयांनी म्हटले आहे.पालकमंत्र्यांना याची उत्तरे द्यावीतपालकमंत्री दहा वर्षांपासून आमदार आहेत. त्यांनी आमदार फंड नेमका कुठे खर्च केला? कोणाला दिला? त्यातून कोणती व किती विकासकामे झाली? राज्यात क्रमांक दोनचे वजनदार मंत्री असूनही शहरासाठी गेल्या साडेतीन वर्षांत किती निधी आणला? त्याचा कोल्हापूरला कितपत फायदा झाला..?विद्या प्रबोधिनी ही चार वर्षांत कशी मोठी झाली?विभागीय क्रीडासंकुल कोणाच्या घशात घालण्याचा घाट रचला आहे?विविध संस्थांना खिरापतीसारखे पैसे कोणता ‘दिवाणजी’ पोहोच करतो? याची चौकशी करा.गतवर्षी गणेशोत्सवात गणेश मंडळांना प्रचंड पैसे वाटले. ते कोठून आले? यापूर्वी कधी पैसे वाटावेसे वाटले नाहीत का?नवदुर्गा ऊर्जा महोत्सव, कोल्हापूर कला महोत्सव हे आत्ताच साध्य कसे झाले? व ते कोणत्या पैशांतून झाले?के. एस. बी. पी. कंपनी सी.एस.आर. फंडाच्या नावाखाली कोणकोणत्या व्यक्ती व संस्थांकडून किती पैसे गोळा करते व शहर सौंदर्यावर त्यांतील किती खर्च करते?